Assagao Local Protest Dainik Gomantak
गोवा

Comunidade Land: 'बोट दिलं तर हात धरतील', बांधकामे नियमित करण्याला आसगाव कोमुनिदादचा विरोध

Comunidade Land Construction Opposition: आसगाव कोमुनिदादच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामे नियमित करण्यास विरोध

Akshata Chhatre

म्हापसा: आसगाव कोमुनिदादच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामे नियमित करण्यास विरोध करणे, तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोमुनिदादच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

आसगाव व बादे गावातील कोमुनिदादच्या जमिनीवर बंधलेल्या बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्याबाबत गोवा विधानसभेच्या दुरूस्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी या सभेत सुमारे 40 गावकार उपस्थित होते. यावेळी जॉन पिरीस, केदार कामत व अ‍ॅड. क्लेटन फोन्सेका यांचा कोमुनिदादमध्ये योगदान दिल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

चर्चेवेळी गावकारांनी एकत्रितपणे कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्यास विरोध केला. सरकारने बांधकामे नियमित करण्याची मुभा अतिक्रमणकर्त्यांना दिल्यास, परिणामी अधिकाधिक बेकायदेशीर बांधकामे निर्माण होतील, असा दावा गावकारांनी यावेळी केला.

गावकारांनी कोमुनिदाद व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आणून दिले की, सरकारने अवैध बांधकामे नियमित करण्याची घोषणा केल्यानंतर जमिनीसभोवती अवैधपणे संरक्षक भिंतीचे कुंपण बांधले जात आहे. तसेच खोल्या बांधल्या जात आहेत, त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

अ‍ॅटर्नी नेल्सन फर्नांडिस यांनी सांगितले की, कोमुनिदादच्या सर्वसाधारण सभेत आसगाव कोमुनिदादच्या जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यास विरोध करणे व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी, 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT