Goa Comunidade Land: 'कोमुनिदादवरील घरे कायदेशीर'चे ते विधेयक तत्काळ रद्द करा! आमदार व्हिएगश यांची राज्‍यपालांकडे मागणी

Comunidade Land: विधानसभेत मंजुरी मिळालेले हे विधेयक तत्‍काळ रद्द करण्‍यात यावे, अशी मागणी आमदार तथा करमळी कोमुनिदादचे अध्‍यक्ष व्‍हेंझी व्‍हिएगश यांच्‍या नेतृत्‍वाखालील शिष्‍टमंडळाने केली.
Goa Comunidade Land
Goa Comunidade LandDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोमुनिदाद जमिनीवरील घरे कायदेशीर करण्‍याचा निर्णय सरकारने केवळ सरकारी तिजोरी भरण्‍यासाठी घेतला आहे. त्‍यामुळे राज्‍यपालांनी या विधेयकाला मंजुरी देऊ नये. विधानसभेत मंजुरी मिळालेले हे विधेयक तत्‍काळ रद्द करण्‍यात यावे, अशी मागणी आमदार तथा करमळी कोमुनिदादचे अध्‍यक्ष व्‍हेंझी व्‍हिएगश यांच्‍या नेतृत्‍वाखालील शिष्‍टमंडळाने बुधवारी राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन केली. यासंदर्भातील निवेदनही त्‍यांनी राज्यपालांना सादर केले.

चिंचिणी कोमुनिदाद अध्यक्ष आग्नेल फुर्तादो, गोलती कोमुनिदादचे अध्यक्ष लुईस डिसोझा, ब्लेअर रॉड्रिग्ज व सुकूर मिनेझिस यांचा या शिष्‍टमंडळात समावेश होता. नुकत्‍याच झालेल्‍या पावसाळी अधिवेशनात राज्‍य सरकारने सरकारी जागेसाठी कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदा घरेही कायदेशीर करण्‍याबाबतचे विधेयक सभागृहात आणून त्‍याला मंजुरी मिळवून घेतली.

या विधेयकाला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतलेला होता. तरीही सरकारने त्‍यांच्‍या विरोधाकडे दुर्लक्ष करीत विधेयक संमत केले. पावसाळी अधिवेशन संपताच काही कोमुनिदादींनी या विधेयकाला आक्षेप घेण्‍यास सुरुवात केली. तर, काही कोमुनिदादींनी पाठिंबा देण्‍यास सुरुवात केली आहे.

Goa Comunidade Land
Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

‘लोलये-पोळे’कडून स्वागत

सरकारच्या कोमुनिदाद जमिनीतील बेकायदेशीर घरे नियमित करण्याच्या विधेयकाचे लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत स्वागत केले आहे. कोमुनिदाद संस्थेचे अध्यक्ष विश्वजीत वारीक म्हणाले, गोवा मुक्तीपूर्वी व नंतर कोमुनिदाद मालकीच्या जमिनीत ज्यांनी अतिक्रमण करून घरे उभारली त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती, ती या विधेयकामुळे कायमची दूर जाणार आहे.

लोलये कोमुनिदाद मालकीच्या दापट व माड्डीतळप येथील जमिनीत अतिक्रमण झाले आहे, मात्र ते बहुतांश स्थानिक रहिवासी आहेत. त्यांना संरक्षण मिळणार आहे. यावेळी भूषण प्रभूगावकर, संस्थेचे पदाधिकारी माधव प्रभू शास्त्री, चंद्रकांत प्रभूगावकर व वारीक उपस्थित होते.

Goa Comunidade Land
Goa News: गोवा हिंदू युवा शक्ती तर्फे सार्वजनिकांना वाजवी दरात फळे व फुले उपलब्ध; वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

जनतेची लूट!

या पार्श्वभूमीवर, आमदार व्‍हेंझींच्‍या नेतृत्‍वाखालील शिष्‍टमंडळाने राज्‍यपालांची भेट घेत, हे विधेयक रद्द करण्‍याची मागणी केली. कोमुनिदाद जमिनीवर सरकारचा कोणताही अधिकार नसतो. तरीही सरकारने कोमुनिदाद जमिनीवर अनेक वर्षांपूर्वी घरे बांधलेल्‍या गोरगरीब जनतेला लुटण्‍यासाठी घरे कायदेशीर करण्‍यासंबंधीचे विधेयक संमत करून घेतले आहे, अशी टीकाही या शिष्‍टमंडळाने पत्रकारांशी बोलताना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com