Par River Pollution Asnoda Dainik Gomantak
गोवा

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Par River Pollution Asnoda: डिचोलीसह बार्देश तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अस्नोडेच्या ‘पार’ नदीला बसलेला प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: डिचोलीसह बार्देश तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या अस्नोडेच्या ‘पार’ नदीला बसलेला प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून, या नदीचे अस्तित्व संकटात आले आहे. एकेकाळी स्वच्छ नदी अशी ओळख आणि डिचोलीसह बार्देश तालुक्याची तहान भागविणारी ‘पार’ नदी गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात आहे.

या नदीला प्लास्टिक आदी कचऱ्याचे ग्रहण लागले असतानाच, आता या नदीत चारा आदी जलपर्णीने आक्रमण केले आहे. या नदीवरील संकटाची दखल घेवून पंचायत तसेच अन्य यंत्रणांनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जागृत नागरिकांकडून होत आहे. शेती-बागायती पिकांसाठी वरदान ठरलेल्या ''पार''नदीचे पाणी पिण्यासाठीही वापरतात.

या नदीतील पाणी पंपिंग करुन अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात या पाण्यावर प्रक्रिया करून ते डिचोलीसह बार्देश तालुक्याला पुरविण्यात येते. डिचोलीतील मुळगाव आणि शिरगावहून पुढे बार्देश तालुक्याला जोडलेली ''पार'' नदी डिचोलीसह बार्देश तालुक्यासाठी वरदान ठरत आहे. मात्र याच नदीवर सध्या मानव निर्मित प्रदूषणाचा आघात होत आहे.

कचऱ्यासह या नदीत सांडपाणी मिसळत असतानाच, विविध ठिकाणी कपडे आणि गुरांना धुण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या नदीत अस्वच्छता निर्माण होत आहे. त्यातच आता या नदीत चारा आणि जलपर्णीचे आक्रमण झाले आहे. ''पार'' नदीवरील पुलावरून अस्नोड्याच्या दिशेने जाताना उजव्या बाजूने नदीत मोठ्या प्रमाणात चारा आदी जलपर्णी उगवली आहे.

ज्या भागात जलपर्णी उगवली आहे, त्याठिकाणी नदीचे अस्तित्व अजिबात जाणवत नाही. ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही वर्षांनंतर नदीचे अस्तित्व पूर्ण धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. एकेकाळी म्हणजेच साधारण २० वर्षांपूर्वी किरकोळ अपवाद वगळता ही नदी स्वच्छ दिसून येत होती.

प्लास्टिक कचरा!

‘पार’ नदीत प्लास्टिकसह निर्माल्य टाकण्याचे प्रकार चालूच असतात. त्यामुळे प्रचंड नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचला आहे. त्याशिवाय काहीजण घरातील किंवा हॉटेलमधील कचरा आणि टाकाऊ पदार्थ नदीत टाकतात. ब्रॉयलर कोंबड्यांचे अवशेष आणि टाकाऊ खराब मासळीही नदीत टाकतात, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT