Asked for clarification to Goa government regarding recruitment Dainik Gomantak
गोवा

खोगीर भरतीचा विषय उसवला: गोवा डेअरी चर्चेत

‘त्या’ नोकरभरतीबाबत मागितले गोवा सरकारला स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यातील (goa) दूध उत्पादकांची शिखर संस्था असलेल्या कुर्टी-फोंड्यातील गोवा डेअरीला लागलेले शुक्लकाष्ट संपायची चिन्हे दिसत नाहीत. प्रशासकीय कामकाजातील मतभेद उघड झाल्यानंतर नव्याने करण्यात आलेली नोकरभरती आणि गेल्या सरकारच्या काळातील खोगीर भरती (Recruitment) यामुळे गोवा डेअरी (Goa Dairy) कायम चर्चेत राहिली आहे. अशा परिस्थितीत आता सहकार निबंधकांनी 2015-16 या वर्षांतील 33 कामगारांच्या नोकरभरतीसंबंधी डेअरीचे विद्यमान प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. विशेष म्हणजे, या सर्व 33 कामगारांना सेवेत कायम करण्यात आले आहे.

दूध उत्पादकांकडून गोवा डेअरीबद्दल कायम नाराजी आहे. दूध उत्पादकांच्या हिताच्यादृष्टीने कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत असा आरोपच दूध उत्पादक करीत असून डेअरीतील नोकरभरती आणि त्यासंबंधीची प्रक्रिया यासंबंधीचा वाद कायम आहे. गेल्या काळात झालेल्या 33 कामगारांच्या नोकरभरतीचा विषय आता तापला आहे. ही नोकरभरती करताना कोणत्याही नियमांची पूर्तता करण्यात आली नाही, असा आरोप असल्याने सहकार निबंधकांनी त्यासंबंधीचे स्पष्टीकरण प्रशासकीय समितीकडे मागितले आहे.

कामगारांचा इशारा

गोवा डेअरी नफ्यात असल्याचे वारंवार सांगितले जाते, मग आम्हाला सातवा वेतन आयोग का नाही, असा सवाल या कामगार संघटनेने विचारला आहे. सातवा वेतन आयोग लागू करणे तसेच मागचा ‘डीए‘ देण्याची मागणी या संघटनेने केली यासंबंधी निर्णय न झाल्यास आंदोलनाचे अस्त्र उगारले जाईल, असे या संघटनेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Police Recruitment: 800 मीटर धावण्याच्या चाचणीला आव्हान देणारी याचिका न्यायालयानं फेटाळली, 6 उमेदवारांनी घेतला होता आक्षेप

Goa Lokotsav: फूड कोर्ट, चिनी मातीच्‍या वस्‍तूंची अनेकांवर मोहिनी; 'लोकोत्‍सवा'ला स्‍थानिकांसह पर्यटकांचीही गर्दी

Goa Municipal Election: महापालिका निवडणूक; बाबूश यांना घेरण्याची तयारी, विरोधकांची 'एकसंध' मोर्चेबांधणी; उत्पलकडे नजरा...

Omkar Elephant: ...अखेर 'ओंकार' आपल्‍या कळपात, वन अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्र्वास

Louis Berger Case: लुईस बर्जर लाच प्रकरण; 'त्या' 3 साक्षीदारांना आरोपी करण्याची मंत्री कामतांची मागणी न्यायालयानं फेटाळली

SCROLL FOR NEXT