Ashadi Ekadashi 2023 Goa Wari  Dainik Gomantak
गोवा

गजर हरिनामाचा झेंडा रोविला... मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला पायी वारीत सहभाग

गोव्यातून देखील मोठ्या प्रमाणावर वारकरी दरवर्षी लाडक्या विठुरायचे दर्शन घ्यायला जात असतात.

Pramod Yadav

Ashadi Ekadashi 2023 Goa Wari: येत्या 29 जून रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. हरिनामाच्या अखंड गजरात विविध भागातून वैष्णवांचा मेळा विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जात आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक यासह विविध राज्यातील भाविक पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत.

गोव्यातून देखील मोठ्या प्रमाणावर वारकरी दरवर्षी लाडक्या विठुरायचे दर्शन घ्यायला जात असतात. यावर्षी देखील विविध वारकरी मंडळ पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत.

Goa CM Pramod Sawant In Wari

ॐ नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ आमोणा गोवा यांच्या पायी वारी सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी झाले. सावंत यांनी वारकऱ्यांसोबत काही अंतर चालत टाळासह हरिनामाच्या जयघोषात ठेका धरला.

यावेळी पायी वारीतील नागरिकांत मोठा उत्साह दिसून आला. मुख्यमंत्री सावंत यांनी वारकऱ्यांना पुढच्या प्रवासासाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या.

Ashadi Ekadashi 2023 Goa Wari

आषाढी एकादशी येत्या 29 जून रोजी साजरी होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आज मुख्यमंत्री शिंदे यांना श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.

यंदाच्या आषाढी एकादशीला सुमारे 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. असा अंदाज व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या वतीने काळजी घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Goa ZP Election 2025 Live Update: साळमधील मतदान केंद्रावर तणाव; कडक पोलीस बंदोबस्त तैनात, परिस्थिती नियंत्रणात

SCROLL FOR NEXT