asha mahal taleigao Dainik Gomantak
गोवा

Diwali 2024: जिथे 'आशा' प्रज्वलित होते! गोव्यातील महिला पुनर्वसनाची ज्योत..

Asha Mahal Taleigao: पणजी शहराच्या जवळ असलेल्या ताळगाव पंचायतीच्या हद्दीत ३०० वर्षांपूर्वीचे एक घर आहे जे तिथल्या परिसरात ‘आशा महाल’ या नावाने ओळखले जाते. आता केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अखत्यारीत येणार्‍या या घरात 'महिला पुनर्वसन गृहा’ची स्थापना' 1978 मध्ये कामीला द कॉस्टा यांनी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Taleigao's Asha Mahal A 300 Year Old Building Dedicated to Women's Empowerment

पणजी: शहराच्या जवळ असलेल्या ताळगाव पंचायतीच्या हद्दीत ३०० वर्षांपूर्वीचे एक घर आहे जे तिथल्या परिसरात ‘आशा महाल’ या नावाने ओळखले जाते. आता केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अखत्यारीत येणार्‍या या घरात 'महिला पुनर्वसन गृहा’ची स्थापना' 1978 मध्ये कामीला द कॉस्टा यांनी केली. आज 'आशा महाल' चालवण्यासाठी सोकोरीना वास यांच्यासारख्या महिला आणि आशा महालची समिती सशक्तपणे कार्यरत आहे. 

विविध समस्यांमुळे अनेक कुटुंबे आपल्या महिला सदस्यांना इथे सोडून जातात. आशा महालमध्ये या महिलांना तात्पुरता निवारा मिळतो. पीडित महिलांना येथे किमान 3 ते 6 महिने आणि जास्तीत जास्त 3 वर्षे मुक्काम करता येतो. पण अशा अनेक दुर्दैवी स्त्रिया आहेत, ज्या गेली अनेक वर्षे, त्यांचे कुटुंबीय येऊन त्यांना घेऊन जाण्याची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ‘आशा महाल’ ही त्यांची एकमेव आशा राहीली आहे. 

आशा महालमध्ये सध्या लहान मुले आणि महिला मिळून एकूण 14 निराधार व्यक्तींचा निवास आहे. दिवाळी, ख्रिसमस तसेच इतर वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने आशा महाल मधील काही महिला, सणांमध्ये उपयोगी पडणाऱ्या कला वस्तू विक्रीसाठी बनवत असतात. यंदा दिवाळीच्या निमित्ताने तेथील कलाकार महिलांनी आकर्षक अशा पणत्यांची निर्मिती केली आहे. आशा महाल मधील महिलांनी बनवलेल्या कला वस्तू खरेदी करण्यासाठी, आशा महालबद्दल ज्यांना ठाऊक आहे असे अनेक लोक तिथे आवर्जून येतात. अनेकदा त्यांना विशिष्ट वस्तू बनवण्यासाठी तिथल्या महिलाना ऑर्डरही मिळते. 

अशा महाल मधील या सर्जनशील महिला या वस्तूच्या निर्मितीसाठी स्वतःच्या पैशांची गुंतवणूक करतात. अर्थात आशा महालही त्यांना काही प्रमाणात साहित्य पुरवत असते. ज्यावेळी लोक त्यांनी बनवलेले साहित्य खरेदी करतात ती वेळ त्या महिलांसाठी अत्यंत आनंददायी असते. त्यांनी बनवलेल्या आकर्षक पणत्यांना चांगली मागणी असते आणि त्या खपतातही. गणेश चतुर्थी आणि ख्रिसमसच्या काळात या महिला  मिष्टान्नही बनवतात. आशा महालची सुपरीटेंडेंट सोकोरीना वास सांगते, 'इथं बनणाऱ्या वस्तूंच्या किंवा मिष्ठान्नांच्या दर्जाबद्दल आम्ही अगदी काटेकोर असतो. माझी स्वतःची त्यांच्या कामावर देखरेख असते आणि मी त्यांना सतत सांगत असते, आम्ही इथे जे बनवतो ते लोकांना आवडायला हवे.' 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT