Asgaon  Dainik Gomantak
गोवा

Goa Asgaon: आसगाव प्रकरणात पोलिस तपासकामावर सरकारचे नियंत्रण; पूजाच्या वकिलांचा दावा

Asgaon House Demolition Case: राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घर मोडतोड प्रकरणाचा तपास एसआयटी स्वतंत्रपणे करत नाही. त्यात राजकीय हस्तक्षेप होत आहे. राजकीय दबावामुळेच पोलिसांना तिला अटक करायची आहे. सध्या सुरू असलेल्या या पोलिस तपासकामावर सरकारचे नियंत्रण आहे, असा युक्तिवाद पूजा शर्मा हिच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी तिच्या वकिलांनी केला.

संशयित पूजा शर्मा हिने सादर केलेल्या अटकपूर्व जामिनावर पणजीतील प्रधान सत्र न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेली ही सुनावणी आज (शनिवारी) सकाळी पुन्हा सुरू झाली. तिचे वकील सुरेंद्र देसाई यांचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेण्यासाठी ही सुनावणी सत्र न्यायालयाने सोमवारी (८ जुलै) ठेवली आहे.

घर मोडतोडप्रकरणी आगरवाडेकर कुटुंबाने स्थानिक आमदार दिलायला लोबो यांच्याशी संपर्क साधल्यावर त्या घटनास्थळी उपस्थित झाल्या होत्या. त्यानंतर आमदार मायकल लोबो यांनीही या ठिकाणी उपस्थित राहून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मुख्यमंत्र्यांनीही दुसऱ्या दिवशी आगरवाडेकर कुटुंबाची भेट घेऊन पाडलेल्या घराची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आगरवाडेकर कुटुंबाने हणजूण पोलिसांत दाखल केलेली तक्रार मागे घेत असल्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांना दिले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून केला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा दावा पूजाचे वकील देसाई यांनी केला.

‘ते’ घर आगरवाडेकरांचे नाहीच; ख्रिस पिंटो

आगरवाडेकर कुटुंबीयांचा या घरावर कोणताच अधिकार नसल्याने त्यांना तेथून बाहेर काढावे, अशी जबानी जमिनीचे मूळ मालक ख्रिस पिंटो यांनी पूजा शर्मा हिच्याविरुद्ध मार्च २०२४ मध्ये पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवेळी दिली होती, अशी बाजू तिच्या वकिलांनी मांडली.

पूजा फरार हा दावा खोटा

पूजा शर्मा हिने समन्सला प्रतिसाद दिला नसल्याने ती फरार असल्याचा दावा केला जात आहे, तो खोटा आहे. क्राईम ब्रँचच्या एसआयटीने तिला पहिले समन्स बजावून १ जुलैला उपस्थित राहण्यास सांगितले होते. तेव्हा तिने काही अडचणींमुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तारीख द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी त्याला उत्तरच न दिल्याने हा अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: काँग्रेसच्या झेंड्यावरून पणजीत नवा वाद! महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढलेले झेंडे डॉ. अंजली निंबाळकर यांनी पुन्हा लावले

Guru Nakshatra Gochar 2026: अडकलेले पैसे मिळणार, मोठी डील फायनल होणार! देवगुरुच्या नक्षत्र परिवर्तनाने बदलणार 4 राशींचे भाग्य; नोकरदारांचेही अच्छे दिन

Goa Jeweller Fraud: दागिने परत न करणाऱ्या सोनाराविरुद्ध 3 तक्रारी; 14 लाखांची फसवणूक, वास्को पोलिसात तक्रार

Supreme Court: "दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये काय करत होता?" बायकोनं जाब विचारताच नवरा थेट सुप्रीम कोर्टात; नेमकं प्रकरण काय?

'म्हज्यो दिवचलच्यो यादी' रवींद्र फोगेरींची स्मरणयात्रा

SCROLL FOR NEXT