Goa Asgaon: अर्शद ख्वाजाच मास्टरमाईंड; पूजाच्या वकिलांचा युक्तिवाद

Asgaon House Demolition Case: गरज भासल्यास न्यायालयाकडून पूजाचे अटक वॉरंट घेण्याचीही मुभा
Arshad Khwaja Asgaon
Arshad Khwaja Asgaon Dainik Gomantak, Canava
Published on
Updated on

आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणातील मास्टरमाईंड संशयित अर्शद ख्वाजा आहे. त्याने मूळ मालक ख्रिस पिंटो यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई केली. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.

घर असलेली जागा मी खरेदी केली आहे. त्यामुळे ती ताब्यात घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. समन्सची तारीख बदलण्यासाठी विनंती करूनही त्याला एसआयटीने उत्तर दिले नाही. या जागेचे मालक आगरवाडेकर कुटुंब असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही, असा युक्तिवाद पूजा शर्मा यांचे वकील ॲड. सुरेंद्र देसाई यांनी आज पणजीतील प्रधान सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर केला. ही सुनावणी उद्या, ६ रोजी पुढे सुरू राहणार आहे.

Arshad Khwaja Asgaon
Goa Asgaon: निलंबित पोलिसांची चौकशीच नाही; एसआयटी करते काय?

...तर पूजाविरुद्ध अटक वॉरंट

अर्शद ख्वाजा याने आसगाव येथील जमिनीचा मूळ मालक ख्रिस पिंटो यांची जमीन मोकळी करून देण्याची जबाबदारी घेतली होती, असे त्याने सांगितले असले तरी या नाट्यामागे पूजा शर्मा हिचाच हात असल्याचा दाट संशय आहे. त्यामुळे ती चौकशीसाठी हवी आहे. गरज भासल्यास न्यायालयाकडून तिचे अटक वॉरंट घेण्याचीही मुभा आहे, असे या सूत्राने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Parvari Shooting Latest Update
Goa Police Srinivas Naik Investigation
Srinivas Naik Shooting Case Goa
Tarun Tejpal Sexual Assault Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com