Asgaon Water Crisis Dainik Gomantak
गोवा

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Assagao gram sabha raises water shortage issue: अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेल्या आसगावात मर्यादित जलस्रोतांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेल्या आसगावात मर्यादित जलस्रोतांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या बहुमजली निवासी इमारती आणि जलतरण तलावांच्या (स्विमिंग पूल) बांधकामांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते डेस्मंड अल्वारीस यांनी ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. अपुऱ्या पावसामुळे गावातील पाणीसमस्या गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावर सरपंच हनुमंत नाईक यांनी, अशा प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी नगरनियोजन विभागाकडून दिली जात असल्याचे स्पष्ट केले. मात्र, गावातील पाण्याचे दुर्भीक्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांसह टीसीपी आणि जलस्रोत विभागाकडे दाद मागण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. गावाचे नैसर्गिक स्वरूप कोणत्याही परिस्थितीत बदलू दिले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ग्रामसभेत टीसीपी कायद्याच्या कलम ३९(अ)चा मुद्दाही गाजला. सांत-आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी यापूर्वी काही सर्व्हे क्रमांकांकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, हे कलम रद्द करण्याची लेखी मागणी पंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच केल्याचे सरपंचांनी सांगितले. गावात प्रस्तावित डान्स क्लब तसेच वादग्रस्त महाप्रकल्पांना विरोध केल्याबद्दल ग्रामस्थांनी पंचायतीचे अभिनंदन केले. या प्रकल्पांविरोधातील न्यायालयीन लढ्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा (Court) खर्च उचलण्याची तयारी कोमुनिदादने दर्शवली आहे.

विकासकामांवर नियंत्रण आणण्‍याची मागणी

बहुमजली इमारती आणि स्विमिंग पूलच्या बांधकामांना विरोध.

जलस्रोतांच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

टीसीपी व जलस्रोत विभागाकडे दाद मागणार असल्याचे सरपंचांचे आश्वासन.

रस्‍त्‍यांचे वारंवार खोदकाम; नागरिकांना मन:स्‍ताप

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार रस्ते खोदले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असे सरपंचांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: गोव्याच्या हातात आलेला सामना निसटला? 75 वर 4 बाद असताना हिमाचलची त्रिशतकी मजल!

Ranji Trophy: बिहारवर फॉलोऑनची नामुष्की; गोव्याची 290 धावांची आघाडी, पहिल्या विजयाची चाहूल

IND vs NZ 1st ODI: किंग कोहली बनला 'सुपरमॅन'! हवेत झेप घेत पकडला अफलातून कॅच; कॅप्टन कूलचा मोडला रेकॉर्ड VIDEO

Human Trafficking: पीडित महिलांना दोष नको; मानवी तस्कर, दलाल आणि शोषणाच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करा – एआरझेड

Goa Politics: 'खरी आरजी कोणती?' यापेक्षा नेते एकत्र राहणार का? अंतर्गत संघर्षाने पक्षाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT