Panjim Municipal Council's Market Committee: पणजी महानगरपालिकेची मार्केट समिती सक्रिय होताच मार्केटची स्वच्छता झाली आणि शिवाय मार्केटमध्ये आलेली अवकळाही दूर झाली.
बेंटो लॉरीन यांनी समिती अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन एक महिना झाला. समितीची बैठकीही झाली; पण समिती सक्रिय कधी होणार, असा प्रश्न होता.
अध्यक्ष लॉरीन यांनी बुधवारी महापौर, आयुक्तांना घेऊन मार्केटची स्थिती दाखविली. त्यामुळे त्यांनी तत्काळ मार्केटमधील बेशिस्तपणावर आवर घाला आणि स्वच्छता करून घेण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार बुधवारी (ता.12) उपाययोजना केल्याने आज (गुरुवारी) मार्केटमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या जागेवर मोकळेपणा जाणवत होता. मार्केटमधील भाजीपाला, फळे, लिंबू विक्रेत्यांकडून थेटपणे ये-जा करण्याच्या मार्गावर दुकाने थाटण्याचा प्रकार सतत घडत होता.
काही अतिक्रमणे तशीच
यापूर्वी मार्केट समितीची सूत्रे शेखर डेगवेकर यांच्याकडे होती, तेव्हा मार्केटची स्वच्छता व बेकायदेशीरपणा खपवून घेतला जात नव्हता.
परंतु सध्या त्यात सुधारणा होत असली तरी अजूनही अतिक्रमण केलेली अनेक ठिकाणे आहे तशीच असल्याचे दिसून येते. गुरुवारी सायंकाळी अध्यक्ष बेंटो लॉरीन यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना घेऊन मोकळा परिसर स्वच्छ करून घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.