G-20 Summit Goa 2023: जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जी-20 शिखर परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, 17 ते बुधवार, 19 एप्रिलदरम्यान पणजीत होत आहे.
यानिमित्ताने 19 देश आणि युरोपीयन महासंघाचे सुमारे 250 प्रतिनिधी आजपासून राज्यात दाखल होत आहेत.
यासाठी पणजीनगरी सज्ज झाली असून देशहिताबरोबर राज्याच्या साधनसुविधा आणि प्रशासन गतिमान होण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे मत या परिषदेचे राज्याचे नोडल अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी व्यक्त केले आहे.
संजित रॉड्रिग्स म्हणाले, जी-20 राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेचे यजमानपद यंदा भारताकडे आहे. भारतात होणाऱ्या 200 बैठकांपैकी 8 बैठका राज्यात होत आहेत.
पहिल्या इफ्फीची आठवण
अशाप्रकारे साधनसुविधांच्या विकासाची गतिमान कामे 2003 साली हाती घेण्यात आली होती. त्यावेळी गोव्यात प्रथमच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन झाले होते.
जी-20 बैठकांच्या माध्यमातून गोव्याच्या विकासाला चालना देण्याच्या विचाराने सर्वच खात्यांच्या यंत्रणेकडून अहोरात्र काम सुरू आहे, अशी माहिती रॉड्रिग्ज यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्यांचे डांबरीकरण (हॉटमिक्स) तसेच सुधारणाकाम रस्त्यांचे सुशोभीकरण आणि रस्ता दुभाजकांचे रंगकामही करण्यात आले आहे.
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने रस्त्यांचे स्वच्छताकाम हाती घेतले आहे. आवश्यक ठिकाणी रस्त्यांवरील वीजखांब व उपकरणे बदलून आधुनिक तंत्रज्ञानाची उपकरणे बसविण्यात आली आहेत.
- भूषण सावईकर, जी-20 साठीचे विशेष अधिकारी
साधनसुविधांमध्ये मोठी भर
राज्यात जी-20 च्या निमित्ताने रस्ताकामे, सौंदर्यीकरण तसेच कचरा व्यवस्थापनासंबंधीची कामे केली जात आहेत.
या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनांमुळे या कामांना आता स्मार्ट सिटी (आयपीएससीडीएल), वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आणि गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ या विभागांच्या माध्यमातून चांगली गती मिळाली आहे.
जी-20 निमित्त बैठका
2 री आरोग्य कार्यगट बैठक - 17 ते 19 एप्रिल
3 री विकासात्मक कार्यगट बैठक - 9 ते 11 मे
3 री जागतिक आर्थिक पुनर्बांधणी बैठक - 5 ते 7 जून
एसएआय 20 शिखर बैठक - 12 ते 14 जून
4 थी पर्यटन कार्यगट बैठक - 19 ते 20 जून
पर्यटन कार्यगट बैठक - 21 ते 22 जून
4 थी ऊर्जा कार्यगट बैठक - 19 ते 20 जुलै
ऊर्जा कार्यगट बैठक - 22 जुलै
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.