Goa River  Dainik Gomantak
गोवा

Mapusa River: म्हापसा नदीतील तब्बल 386 किलो कचरा हटवला

Mapusa River: बोटींचा वापर : मयडेतील शंभरहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग

दैनिक गोमन्तक

Mapusa River:

शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी मयडे येथे म्हापसा नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी नदीत फेकलेला सुमारे 358 किलो कचरा बाहेर काढून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. नंतर हा कचरा विल्हेवाटीसाठी मयडे पंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला.

बाका कयाक्स, ट्रॅव्हल एक्सपीसोबत रोटरॅक्ट म्हापसा आणि हळदोणा भाजप युवक मंडळाने रविवारी मयडे येथील कॅटरुलीम रॅम्पवर ‘कयाक नदी स्वच्छता मोहीम राबवली. ज्यात १००हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले.

कचरा काढण्यासाठी कायक बोटींचा वापर करण्यात आली. स्वयंसेवकांना लाइफ जॅकेट, हातमोजे, पिशव्या आदी साहित्य पुरवण्यात आले होते. ही मोहीम राबवण्यासाठी संगम म्हापसेकर यांनी पुढाकार घेतला. आदित्य दळवी आणि रोटरॅक्ट म्हापसाच्या सदस्यांना या मोहिमेला सहकार्य केले.

या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार ग्लेन टिकलो आणि इतरांनीही सहभाग घेतला. बोटींचा वापर करत सुमारे एक किलो मीटरचा परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. स्वयंसेवकांनी पाण्यात तरंगत असलेला तसेच झाडांमध्ये अडकलेला कचरा हटवला.

128 किलो दारूच्या बाटल्या

स्वयंसेवकांनी नदीपात्रातून काढलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो पिशव्यांत भरण्यात आला. एकूण 358 किलो कचरा गोळा करण्यात आला. ज्यात 128 किलो काचेच्या कचरा (दारूच्या रिकामी बाटल्या) आढळून आल्या. 121 किलो प्लास्टिक कचरा तर 28 किलो मटेरिअल कचरा आणि पुनर्वापर न करता येणारा 24 किलो व 57 किलो हा इतर कचरा होता.

नदीत मोठ्या प्रमाणात कचरा तरंगताना दिसतो. अनेकजण आपल्या घरातील कचरा आणून नदीत टाकतात, त्यामुळे नदी प्रदूषित होते, मात्र याचे भान कचरा टाकणाऱ्यांना नसते. मयडेत 100 हून अधिक लोकांनी एकत्र येऊन नदीत तंरगणारा कचरा गोळा केला.
- आदित्य दळवी
नदीत टाकण्यात येणारा कचरा ही मोठी समस्या आहे. नदी प्रदूषित झाली तर त्याचा परिणाम माणसाच्या जगण्यावरही होत असतो. त्यामुळे आवश्यक सुरक्षा खबरदारी घेऊन नदी स्वच्छ करण्याची मोहीम राबवण्यात आली.
- संगम म्हापसेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT