Goa News |Fish Dainik Gomantak
गोवा

Goa Fish : गोमंतकीयांच्‍या ताटात तमिळनाडूतील मासळी; राज्यातील मासेमारी बंदीचा परिणाम

ओडिशा आणि पश्चिम बंगालमधूनही येणार मासे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Fish : गोव्‍यासह पश्चिम किनारपट्टीतील समुद्रात मासेमारी बंद झालेली असताना आता गोव्‍यात दक्षिणेकडील राज्यांतील मासे येऊ लागले असून सध्‍या गोवेकरांच्‍या ताटात जो मासा पडतो, तो एक तर तामिळनाडू किंवा आंध्रप्रदेशच्या किनारी भागातून आलेला असतो.

सध्‍या पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी असली तरी पूर्व किनारपट्टीवरील मासेमारी चालूच आहे. सध्‍या जरी तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथून मासे आणले जात असले, तरी ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्‍यातील मासेही हळूहळू गोव्‍यात येणार असल्‍याची माहिती येथील घाऊक मत्‍स्‍य व्‍यावसायिकांनी दिली.

मडगाव बाजारपेठेत सध्‍या दररोज पाच ते सहा ट्रक मासळी तमिळनाडू व आंध्रप्रदेशातून आणली जाते. हे मासे ३० ते ४० टन असतात, अशी माहिती घाऊक मासळी विक्रेते संघटनेचे अध्‍यक्ष एम. एम. इब्राहीम यांनी दिली.

तामिळनाडू व आंध्रप्रदेश ही राज्‍ये गोव्‍यापासून तशी जवळ असल्‍याने गोव्‍यात येणारी मासळी ताजीच असते, असे त्‍यांनी सांगितले. सध्‍या मडगाव बाजारपेठेत बांगडे व तारले यांचीच आवक जास्‍त असून बांगड्याचा दर प्रतिकिलो १२० ते १३० या दरम्‍यान असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली.

दरम्‍यान, गोव्‍यात समुद्र खवळलेला असल्‍याने होडी घेऊन केली जाणारी मासेमारी पूर्णत: बंद असून सध्‍या मडगाव बाजारात येणारी मासळी ही पूर्णत: पूर्व किनारपट्टीवरूनच आणली जाते, अशी माहिती इब्राहीम यांनी दिली.

पोळे नाक्यावर मासळीची नियमित

काही वर्षांपूर्वी पूर्व किनारपट्टीवरून आणलेल्‍या मासळीत फाॅर्मेलीन घातले जाते अशी वदंता पसरल्‍याने लोकांमध्‍ये घबराट निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आता गोव्‍यात येणाऱ्या मासळीची तपासणी पोळे चेक नाक्‍यावर नियमितपणे केली जात असून गरज पडल्‍यास मडगाव मार्केटातही ही तपासणी करण्‍याची सोय ठेवण्‍यात आली आहे, अशी माहिती अन्‍न व औषध प्रशासन खात्‍याकडून मिळाली. अजून तरी फॉर्मेलीनचा अंश असलेली मासळी आम्‍हाला सापडली नाही, अशीही माहिती या खात्‍याने दिली.

"मडगाव मासळी बाजारात येणाऱ्या मासळीची चाचणी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या स्वतंत्र केंद्रीय एजन्सीद्वारे केली जाते. ही चाचणी सुविधा जुलै २०२० पासून सुरू आहे. मासे घेऊन मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनातून मासळीचे नमुने घेतले जातात व त्याची चाचणी झाल्यानंतरच त्या वाहनांना घाऊक बाजारात प्रवेश दिला जातो."

"भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मान्यतेचे रॅपिड टेस्टिंग किट वापरून ही चाचणी केली जाते. अशीच चाचणी गोव्यातील पोळे आणि पत्रादेवी येथे याच एजन्सीद्वारे वर्षभर २४ तास केली जाते."

- ज्योती सरदेसाई, एफडीए संचालिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

SCROLL FOR NEXT