Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Hong Kong Fire Viral Video: हाँगकाँग शहरात नुकत्याच लागलेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली.
Hong Kong Fire Viral Video
Hong Kong Fire VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Hong Kong Fire Video: हाँगकाँग शहरात नुकत्याच लागलेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. ताई पो येथील वांग फुक कोर्ट हाउसिंग कॉम्प्लेक्समधील एका उंच इमारतीला ही आग लागली, ज्याला हाँगकाँगच्या इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटनांपैकी एक मानले जात आहे. आग (Fire) विझवण्यासाठी मोठ्या संख्येने अग्निशमन दलाचे जवान अनेक तासांपासून कार्यरत होते, मात्र ही आग इतकी भीषण होती की मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

65 हून अधिक लोकांचा मृत्यू

या भीषण दुर्घटनेतील नुकसानीचा आकडा आता समोर येत आहे. ताज्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत सुमारे 65 लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेचा एक अत्यंत भयानक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @AliDarwesh94 नावाच्या हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये आगीची तीव्रता आणि विदारक दृश्य दिसत आहे.

Hong Kong Fire Viral Video
VIDEO: ट्रॉफी जिंकली पण बोलताना लाज घालवली! पाकिस्तानी क्रिकेटरची पुन्हा फजिती, ट्रान्सलेट करणाऱ्यानेच घातला गोंधळ

निष्काळजीपणामुळे आग पसरल्याचा दावा

या दुर्घटनेच्या कारणांबद्दल बोलताना अधिकाऱ्यांनी गंभीर वक्तव्य केले. या घटनेबद्दल बोलताना अधीक्षक एलीन चुंग यांनी म्हटले की, "आमच्याकडे हे मानण्याचे पुरेसे कारण आहे की, संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आणि आग अनियंत्रितपणे पसरली. यामुळेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि अनेक लोक जखमी झाले.''

Hong Kong Fire Viral Video
US China Trade: डोनाल्ड ट्रम्प, जिनपिंग यांच्यात होणार मिटिंग? आयातशुल्क निर्णय 90 दिवस लांबणीवर; वाद टळला

ज्या उंच इमारतीला आग लागली, ती हाँगकाँगच्या (Hong Kong) दाट लोकवस्तीच्या भागातील हाउसिंग कॉम्प्लेक्समधील होती. त्यामुळे आग लागल्यामुळे लोकांना बाहेर पडणे आणि बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे, आता याप्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. हाँगकाँग प्रशासनाने या दुर्घटनेवर तात्काळ नियंत्रण मिळवण्याचे आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत पोहोचवण्याचे काम सुरु केले आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी इमारतींच्या सुरक्षा मानकांची कठोर तपासणी करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com