Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

Arvind Kejriwal In Goa: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात पोहोचले.

Manish Jadhav

पणजी: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात पोहोचले. पोहोचताच त्यांनी भाजपच्या 13 वर्षांच्या राजवटीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत जोरदार टीका केली.

13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा

गोव्यातील (Goa) भाजपच्या सलग 13 वर्षांच्या राजवटीवर हल्लाबोल करताना केजरीवाल यांनी या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अपयश दिसून आले असल्याचा दावा केला. "भाजपने गेली 13 वर्षे गोव्यात फक्त भ्रष्टाचार केला. प्रत्येक शासकीय कामात गैरव्यवहार आणि अनियमितता आहेत," असा थेट आरोप त्यांनी केला.

प्रशासकीय अपयशाचे ताजे उदाहरण देताना केजरीवाल यांनी हडफडे दुर्घटनेचा उल्लेख केला. या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला. हे भीषण अग्निकांड या प्रशासकीय अपयशाचे उदाहरण आहे. जर प्रशासनाने नियम आणि सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिले असते, तर इतके निष्पाप जीव गेले नसते, असे ते म्हणाले. या घटनेमुळे गोव्यातील प्रशासकीय ढिलाई आणि भ्रष्टाचाराचा पुरावाच मिळाला, असेही ते पुढे म्हणाले.

झेडपी निवडणूक ही बदलाची पहिली पायरी

पुढे केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला आगामी 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.

"20 डिसेंबरची झेडपी निवडणूक ही गोव्यातील खऱ्या बदलाची पहिली पायरी आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत 'आप'ला पाठिंबा देणे म्हणजे 2027 च्या विधानसभा निवडणुकीतील सत्तांतराची तयारी करणे आहे. गोव्यातील लोकांना जर खरंच चांगले शिक्षण, आरोग्य सेवा आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी असेल, तर त्यांनी 'आप'ला साथ द्यावी," असे आवाहन देखील केजरीवाल यांनी केले.

भाजपला (BJP) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन घेरण्याचा 'आप'चा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. मात्र गोव्यातील जनता या आरोपांना कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT