E20 Petrol Dainilk Gomantak
गोवा

'E20 Petrol' विरोधात 'आप'चा एल्गार; वाहनचालकांच्या तक्रारींसाठी व्‍हॉट्सॲप क्रमांक जारी

E20 Petrol Complaints Goa: ई-२० पेट्रोलविरोधात देशभर रान पेटवलेल्‍या दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्‍यातही अशा पेट्रोलसंदर्भात तक्रारी करण्‍यासाठी व्‍हॉट्सॲप क्रमांक जारी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ई-२० पेट्रोलविरोधात देशभर रान पेटवलेल्‍या दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे (आप) राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्‍यातही अशा पेट्रोलसंदर्भात तक्रारी करण्‍यासाठी व्‍हॉट्सॲप क्रमांक जारी केला. सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्‍हणाले, ‘‘गेल्‍या गोवा दौऱ्यादरम्यान आपण ई-२० पेट्रोलमुळे गोमंतकीयांच्‍या वाहनांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले होते.

त्‍यानंतर हजारो गोमंतकीयांनी आपापल्‍या समस्‍या आमच्‍याकडे मांडलेल्‍या होत्‍या. त्‍यामुळेच इतर नागरिकांच्‍या समस्‍या जाणून घेण्‍यासाठी ‘आप’तर्फे ७६६९८०३४४१ हा व्‍हॉट्सॲप क्रमांक जारी करण्‍यात येत आहे. यावर नागरिकांना फक्त आपल्या तक्रारींचा मेसेज पाठवता येईल. नागरिकांनी या क्रमांकाद्वारे आपापल्‍या समस्‍या ‘आप’कडे मांडाव्‍यात. तसेच याबाबत मंगळवारी (ता.२५) पणजीतील ताज विवांता हॉटेलमध्‍ये दु. ३ वा. आयोजित टाऊनहॉलमध्ये सहभागी सहभागी व्‍हावे.’’

काही नागरिकांच्या तक्रारींचा उल्लेख करताना, ‘‘पूर्वी त्यांच्या वाहनांना सुमारे ४५ किमी प्रतिलिटर मायलेज मिळत होते. मात्र, आता ते केवळ ३५ किमी प्रतिलिटर इतकेच मिळत आहे. गोव्‍यातील अनेकांना इंधनामुळे वाहनांचे महागडे दुरुस्ती खर्च करण्यापेक्षा अधिक पैसे देऊन शुद्ध पेट्रोल घेणे परवडेल, असे वाटते. पेट्रोलचे दर आधीच मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

त्यातच आता ग्राहकांना इथेनॉलमिश्रित पेट्रोल दिले जात आहे. इथेनॉल निर्मितीसाठी २५ लाख टन ऊस वळवण्यात आला. त्‍यामुळे देशभर साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, एका महिन्यात साखरेचा दर सुमारे ४५ रुपये प्रतिकिलोवरून ७० रुपये प्रतिकिलो झाला आहे’’, असा दावाही केजरीवाल यांनी केला. ‘आप’च्‍या प्रभारी आतिषी, प्रदेशाध्‍यक्ष वाल्‍मिकी नाईक यांच्‍यासह इतर पदाधिकारीही यावेळी उपस्‍थित होते.

ऑटोमोबाईल उद्योजकांवर दबाव

‘‘सरकारने इथेनॉल मिश्रणामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत होईल, असा दावा केला होता. मात्र, साखर आणि इतर वस्तूंच्या आयातीची वाढती गरज या कथित बचतीवर पाणी फेरू शकते. सरकार भविष्‍यात पुरेशा वैज्ञानिक अभ्यास, चाचण्या आणि आवश्यक तयारीशिवाय ई-३०, ई-४० आणि ई-८५ सारख्या अधिक प्रमाणातील इथेनॉल मिश्रणाकडेही जाणार आहे. ऑटोमोबाईल उद्योगातील संबंधित घटकांवर ई-२० पेट्रोलच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी दबाव आणला जात आहे’’, असा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT