Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Arvind Kejriwal Criticism BJP: भाजप सरकार ७५हून अधिक दिवसांपासून गावासाठी शांतपणे लढणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन हुकूमशाही पद्धती अवलंबत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भाजप सरकार ७५हून अधिक दिवसांपासून गावासाठी शांतपणे लढणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन हुकूमशाही पद्धती अवलंबत आहे. जसा गोमंतकीयांनी एकत्र येऊन पोर्तुगीज सत्तेचा अहंकार मोडून काढला, तसेच ते पुन्हा आगामी निवडणुकीत भाजपचा अहंकार मोडून काढतील, असे मत ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले.

गोवा क्रांतिदिनानिमित्त केजरीवाल यांच्यासह गोवा प्रभारी आतिषी मार्लेना, गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतर नेत्यांनी आझाद मैदानावर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना गुरुवारी (ता.१८) श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, लोढा मेगा प्रकल्प रद्द होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहिला पाहिजे, असे केजरीवाल यांनी आंदोलकांना पाठिंबा देताना सांगितले.

‘आप’चा पाठिंबा!

आझाद मैदानावर श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर वाल्मिकी नाईक, क्रूझ सिल्वा, संदेश तेलेकर-देसाई व इतरांनी जुनेगोवे पोलिस स्थानकाकडे धाव घेतली. त्याठिकाणी कारापूर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांना पाठिंबा दिला. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या वृत्तीचा त्यांनी निषेध केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT