Arvind Kejriwal in Goa

 

Dainik Gomantak

गोवा

गोव्यात पहिलं भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करणार

अरविंद केजरीवालांची गोमंतकीयांना सहावी गॅरंटी

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात आम आदमी पक्ष पहिलं भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. भाजप सरकारने केवळ आश्वासन देऊन गोमंतकीय जनतेची दिशाभूल केली आहे. राज्यातील भाजप सरकारची नियत खराब आहे, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

गोव्यातील निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) 5 गॅरंटी दिल्या आहे. आपचं सरकार इतर पक्षांसारखं केवळ आश्वासन देत नाही, तर दिलेला शब्द पाळण्याचं कामही करतं. आज आपकडून गोमंतकीयांना सहावी गॅरंटी देत असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.

गोव्यात गेल्या 60 वर्षात काँग्रेस (Congress) 27 वर्ष, तर 15 वर्ष भाजप आणि 15 वर्ष 'मगोप'ने सरकारने केवळ भ्रष्टाचार करण्याचंच काम केलेलं आहे. सर्वच पक्षांनी गोव्याला लुटण्याचं काम केलं आहे. मात्र गोमंतकीय जनतेने संधी दिल्यास गोव्यात भ्रष्टाचारमुक्त आणि इमानदार सरकार स्थापन करणार असल्याचं केजरीवालांनी पत्रकार परिषदेत स्षष्ट केलं आहे.

दिल्लीत आपण केलेल्या कामांचा दाखला देत गोव्यातही असाच विकास करण्याचा मानस अरविंद केजरीवालांनी (Arvind Kejriwal) व्यक्त केला. गोव्यासाठी मंजूर झालेला प्रत्येक पैसा हा नेत्यांच्या खिशात नाही तर गोमंतकीय जनतेवरच खर्च केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीच्या धर्तीवर गोव्यातही घरबसल्या विविध ऑनलाईन सेवा गोमंतकीय जनतेला पुरवल्या जातील. पंचायतीमध्ये काम असो, किंवा मुख्यमंत्र्यांकडे काम असो, कोणतही काम आता गोव्यातील जनतेला घरबसल्या करता येईल असा दावाही केजरीवालांनी केला. 'आप'ला फक्त 5 वर्ष संधी देऊन जनतेने पाहावे, त्यांना लगेच बदल दिसेल, असा दावाही केजरीवालांनी केला आहे. तसेच संधी मिळाल्यास 6 महिन्यात गोव्यात मायनिंग पुन्हा सुरु करुन दाखवू अशी घोषणाही केजरीवालांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT