Goa Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy: चौकशी समितीचे स्वागतच! कला अकादमीच्या कुठल्याही चौकशीसाठी तयार : गावडे

कला अकादमीच्या कामाच्या कंत्राटाच्या मूल्यांकनासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

Rajat Sawant

Goa Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामावरून सातत्याने आरोप होत असल्याने या कामाच्या कंत्राटाचे मूल्यांकन करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती ६० दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

दरम्यान, या निर्णयावर कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. कला अकादमीवर बरीच चर्चा सुरू आहे.आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत असे गावडे यांनी सांगितले.

कला अकादमीच्या नुतनीकरण कामाच्या कंत्राटाचेच मुल्यांकन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कामाच्या कंत्राटाच्या मूल्यांकनासाठी स्थापन केलेल्या या समितीमध्ये डॉ. आशिष रेगे, संदीप प्रभू चोडणेकर व डॉ. के. जी. गुप्ता यांचा समावेश करण्यात आला आहे.

या समितीकडून नूतनीकरणाच्या कामाचा दर्जा तसेच यात वापरलेल्या सामग्रीची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. कला अकादमीच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळा तसेच त्यांच्या खर्चात झालेल्या वाढीवरून विरोधकांनी वेळोवेळी आवाज उठविला होता.

या कथित घोटाळ्याप्रकरणी दक्षता खात्याने केलेल्या चौकशीत तथ्य आढळले. त्यामुळे मूल्यांकन समिती नियुक्तीची शिफारस दोन महिन्यांपूर्वी केली होती.

दरम्यान, यापुर्वी कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी नूतनीकृत कला अकादमी 8 डिसेंबर रोजी होणार असल्याचे म्हटले होते. तसेच इफ्फी साठीदेखील कला अकादमी संकुल उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते.

कला अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासनाने संबंधित कंत्राटदारावर दबाव आणला नाही. दर्जेदार कामाची मागणी करत असल्याने आम्हाला थोडा संयम बाळगण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT