Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: संस्कृती संचालनालयातर्फे ‘कलावृद्धी पुरस्काराची’ घोषणा; मंत्री गावडे यांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: दरवर्षी संगीत, नृत्य, नाटक, तियात्र, लोककला, फोटोग्राफी, चित्रकला, क्राफ्ट, शिल्प, भजन, कीर्तन, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील जास्तीत जास्त १० कलाकारांना कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे "कलावृद्धी पुरस्कार" देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

मंत्री गावडे यांनी दिलेल्या महितीनुसार, कला वृद्धी पुरस्कार योजनेचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशंसा प्रमाणपत्र आणि प्रति व्यक्ती २५ हजार रुपये असणार आहे. या योजनेचा हेतू कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांच्या असाधारण योगदानासाठी सन्मानित करण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

योजनेत नमूद केल्यानुसार या योजनेअंतर्गत कोणताही पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार नाही. मात्र समितीच्या शिफारशीनंतर कोणत्याही कलाकाराचा मृत्यू झाल्यास या पुरस्कारासाठी त्या कलाकाराच्या नावाचा विचार करण्यात येईल. वैयक्तिक कलाकार दुसऱ्यांदा योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तसेच कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा सरकारचा युवा सृजन पुरस्कार प्राप्तकर्ता कलावृद्धी पुरस्कारासाठी अर्ज करण्यास किंवा प्राप्त करण्यास पात्र असणार नाही.

कला क्षेत्रात १० वर्षे योगदान आवश्‍यक

अर्ज प्राप्त झाल्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ४० वर्षे पूर्ण केलेले आणि ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेले वैयक्तिक कलाकार या पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात विलक्षण योगदान देणारा वैयक्तिक कलाकार कला वृद्धी पुरस्कारासाठी अर्ज करू शकणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान १० वर्षे संबंधित कला क्षेत्रात योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे योजनेत नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: विद्यार्थ्यांच्या भांडणात तिसरीतली विद्यार्थीनी गंभीर जखमी, अत्यवस्थ होऊनही शाळेचे दुर्लक्ष; पालक संतप्त

Sunburn Festival 2024: ‘आमका नाका सनबर्न’! गावपण टिकवण्यासाठी कामुर्लीत स्थानिक एकवटले

Bollywood Actress Alia Bhatt: हसमुख आलियाचा हॉट अंदाज चाहत्यांना मोहीनी घालतोय!

Goa Eco Sensitive Zone बाबत 'सरकारचे' म्हणणे पोचण्याआधी 'ग्रामस्थांची निवेदने' दिल्लीत पोचली; पैंगीण, लोलयेचे जैवविविधतेला प्राधान्य

Kulem Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'; कुत्रे आडवे आल्याने झाला विचित्र अपघात; दोघे आश्‍चर्यकारकरित्या बचावले

SCROLL FOR NEXT