Arrest CM Pramod Sawant Demand Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अटक करा; काँग्रेसची मागणी

Goa Congress: गोवा काँग्रेसने मलिक यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसिद्ध करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Pramod Yadav

Arrest CM Pramod Sawant Demand Goa Congress

गोव्यात कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

गोवा काँग्रेसने मलिक यांच्या मुलाखतीचा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ प्रसिद्ध करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडच्या काळात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केल्याचा मेघालय आणि गोव्याचे माजी राज्यपाल मलिक यांनी उघड केले. याप्रकरणी कारवाईची मागणी केली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी काहीच केले नाही. आता तरी आमचे आव्हान स्वीकारा आणि सर्वात भ्रष्ट डॉ. प्रमोद सावंत यांना अटक करा, अशी मागणी काँग्रेसने केलीय.

देर आये दुरुस्त आये! असे म्हणत काँग्रेसने माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा व्हिडीओ जारी करत मुख्यमंत्र्यांच्या अटकेची मागणी केलीय.

गोवा भाजपच्या एक्स हँडलवर काँग्रेस आपवर आरोप करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिल्ली कथित मद्य घोटाळ्यावर आरोप करणारी काँग्रेस गोव्यात आघाडीसोबत आहे, जनता त्यांना धडा शिकवेल, असे भाजपने म्हटले आहे. त्याला उत्तर देताना काँग्रेसने दोन वर्षापूर्वीचा सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत सावंत यांच्या अटकेची मागणी केली आहे.

काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

प्रमोद सावंत मुख्यमंत्री असताना कोरोना काळात गोव्यात भ्रष्टाचार झाला. याबाबत दोन कोकणी गायकांनी गीत देखील म्हटले होते. राज्याच्या सर्व कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मलिक यांनी या मुलाखतीत केला होता.

एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने मला हटविण्यात आले. मी लोहिया विचारसरणीचा असल्याने मला भ्रष्टाचार सहन होत नाही, असेही मलिक म्हणाले.

खाण वाहतूक सुरुच असल्याने कोरोना पसरला

गोव्यात कोरोना काळात खाण वाहतूक सुरु ठेवल्याने कोरोना पसरला, असाही आरोप मलिक यांनी केला.

भ्रष्टाचार प्रकरणी पंतप्रधान मोदींनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न विचारला असता पंतप्रधानांना चुकीची माहिती दिली जाऊ शकते, कारण मोदींना माहिती देणारे देखील भ्रष्टाचारात सामिल होते, असे मलिक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Language: '..पेटून उठण्याची वेळ आली आहे', वेलिंगकरांचा निर्धार; मराठीला संपवण्याचे षडयंत्र सुरू असल्याची भीती व्यक्त

Loliem: फिल्‍म सिटी, युनिटी मॉल नकोच! ग्रामसभा तापल्‍या; लोलयेवासीयांचा तिसऱ्या जिल्‍ह्यासह 13 प्रकल्‍पांना विरोध

Merces: ..मध्यरात्री मडगावकडे जाणारी बस पेटली! मेरशी सर्कलजवळ घडली थरारक घटना; पर्यटकांची जीव वाचविण्यासाठी धडपड

Assagao Raid: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त; जम्मू काश्मीरच्या व्यक्तीला अटक; सात लाखांची रोकड जप्त

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

SCROLL FOR NEXT