Stray cattle collision Goa Dainik Gomantak
गोवा

Arpora: भटक्या गुरांची झुंज, दुचाकीला बसली जोरदार धडक; हणजूणच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Goa Tragic Death: दुर्घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी तात्काळ धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील रायनला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.

Sameer Panditrao

कळंगुट : हडफडे येथील सॉल्ट रेस्टॉरंटसमोरील रस्त्यावर आपापसांत झुंजणाऱ्या भटक्या गुरांची जोरदार धडक बसल्याने हणजूण येथील रायन जोसेफ ज्युड आल्मेदा (वय ४५ वर्षे) या तरुण दुचाकीचालकाचा नाहक बळी गेला.

रायन आल्मेदा हा शनिवारी संध्याकाळी हडफडे येथून हणजूणच्या दिशेने येत असता येथील सॉल्ट रेस्टॉरंटच्या समोरील रस्त्यावर झुंजीत दंग असलेल्या भटक्या गुरांची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. बैलांची धडक बसल्यानंतर रायनच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची (क्र : जेएच-०१-बी.टी.-५६४५) जोरदार धडक बसली.

त्यात तो गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलिसांनी तात्काळ धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील रायनला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रायनला मृत घोषित केले.

रेल्वेच्या धडकेने युवकाने गमावला जीव

करमळी येथे रेल्वेच्या धडकेने शनिवारी मूळ झारखंड येथील बावीस वर्षीय युवक ठार झाला. प्रवीण किरो असे मृताचे नाव असून मृतदेह गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. प्रवीण हा दोनच महिन्यांपूर्वी गोव्यात कामासाठी आला होता.

मृताच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. कुटुंबीय आल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विप्लव वस्त पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT