Arpora Dainik Gomantak
गोवा

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

Goa Nightclub Fire: हडफडे–नागवा पंचायतीने हे बांधकाम १५ दिवसांत पाडण्‍याचा आदेशही जारी केला होता. परंतु, ‘सीझेडएमए’ने हे बांधकाम कायदेशीर असल्‍याचा निवाडा दिलेला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडे–नागवा भागातील सर्वे क्रमांक १५८/१ आणि १५९/१ या इको सेन्‍सिटिव्‍ह झोन भागात सुरिंदर कुमार खोसला यांनी ‘बर्च बाय रोमियो लेन’ नावाचे बेकायदेशीर बांधकाम उभे केल्‍याची तक्रार प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी ११ मार्च २०२४ रोजी पंचायत खाते आणि २४ नोव्‍हेंबर २०२५ रोजी किनारी क्षेत्र व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडे (सीझेडएमए) केली होती.

त्‍यानंतर हडफडे–नागवा पंचायतीने हे बांधकाम १५ दिवसांत पाडण्‍याचा आदेशही जारी केला होता. परंतु, ‘सीझेडएमए’ने हे बांधकाम कायदेशीर असल्‍याचा निवाडा दिलेला होता.

‘बर्च बाय रोमियो लेन’ क्‍लबमधील घटनेची चर्चा देशभर सुरू आहे. या क्‍लबच्‍या बांधकामाविरोधात आमोणकर आणि दिवकर यांनी पंचायतीसह ‘सीझेडएमए’कडे तक्रार करूनही तक्रारींची गंभीर दखल न घेतल्‍याचे समोर आले आहे.

म्हणून केली होती मागणी

१. ‘बर्च बाय रोमियो लेन’ क्‍लबचे बांधकाम ‘इको सेन्‍सिटिव्‍ह झोन’ मध्‍ये झालेले आहे. या बांधकामामुळे तेथील कृषी जमीन आणि मिठागरांची हानी झालेली आहे. शिवाय खोसला यांनी सर्वे क्रमांक १५८ मध्‍ये बेकायदेशीररीत्‍या जी बांधकामे उभारली आहेत,

त्‍या आस्‍थापनांमधील सांडपाणी बागा नदीत सोडण्‍यात येत आहे. त्‍यामुळे ही बांधकामे तत्‍काळ जमीनदोस्‍त करण्‍यात यावी, अशी मागणी आमोणकर आणि दिवकर यांनी केली होती.

२. या मागणीनंतर पंचायतीने खोसला यांना १५ दिवसांत संबंधित बांधकामे पाडण्‍याचा आदेश दिलेला होता. परंतु, या आदेशाला खोसला यांनी पंचायत खात्‍यात आव्‍हान देऊन स्‍थगिती मिळवलेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhave: सफर गोव्याची! पणजीतून पहिली कदंबा ज्या गावी आली, सत्तरीतला पहिला मुक्तीसंग्रह जिथे सुरु झाला असे स्वातंत्र्यसैनिकांचे 'धावे' गाव

UAE President India Visit: दोन तासांचा 'सस्पेन्स' दौरा! युएई अध्यक्षांची अचानक भारत भेट; मोठ्या निर्णयाची शक्यता? VIDEO

Goa Noise Pollution: गोव्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही! 36 जणांवर कारवाई करत 20 लाखांचा दंड वसूल; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इंगा

Navpancham Rajyoga: राजयोगांचा राजा 'नवपंचम योग'! 30 वर्षांनंतर नशीब चमकवणार शनी-बुध; 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

Goa Murder: 100 रुपयांचा 'रबर मुकुट' बनला रशियन तरुणींचा काळ! खुनी आलेक्सेईच्या फोनमध्ये सापडले 100 हून अधिक महिलांचे फोटो

SCROLL FOR NEXT