Sameer Amunekar
गोव्यातील हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
‘बर्च बाय रोमियो लेन’ क्लब भारतातील पहिला “आयलँड नाईट क्लब” म्हणून ओळखला जात होता. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला असल्याने बेटावर असल्याचा अनुभव मिळायचा.
क्लब हडफडे नदीवर पाण्याच्या मधोमध उभारण्यात आला, त्यामुळे येथून नदीचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळायचा.
‘बर्च बाय रोमियो लेन’ केवळ डान्स क्लब नव्हते, तर पूर्ण सुविधा असलेले रेस्टॉरंटही होते – जेवण, ड्रिंक्स आणि पार्टी एकाच ठिकाणी.
येथे नियमितपणे लाईव्ह DJ नाईट, इव्हेंट्स आणि थीम पार्टीचे आयोजन होत असे, ज्यासाठी फार मोठी गर्दी येत असे.
एलईडी लाईट्स, डान्स फ्लोअर, लेझर लाईटिंग आणि आकर्षक इंटिरियरमुळे हा क्लब सोशल मीडियावरही प्रसिद्ध होता.
संध्याकाळी साधारण 6 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत हा क्लब सुरु असायचा आणि लेट-नाईट पार्टीसाठी प्रसिद्ध होता.
येथे विविध प्रकारचे कॉकटेल्स, मॉकटेल्स, स्टार्टर्स, सीफूड आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ उपलब्ध होते, ज्यामुळे पर्यटकांमध्ये याची खास ओळख होती.