Goa Nightclub Fire: "भाजप सरकार हाय हाय..." परवाना नसतानाही नाईट क्लब सुरू कसा? विरोधक आक्रमक! VIDEO

Goa Nightclub Fire Update: गोव्यातील हडफडे येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील हडफडे येथील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आगीच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. लागलेल्या भीषण आगीनंतर विरोधकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “ही दुर्घटना नसून सरकारच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे,” असा आरोप करत विरोधकांनी “भाजप सरकार हाय हाय” अशा घोषणा दिल्या आहेत.

परवाना नसतानाही संबंधित नाईट क्लब बेकायदेशीररीत्या सुरू होता, असा दावा विरोधकांनी केला असून, अशा अनेक अवैध क्लबवर सरकारने आजवर कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Goa Nightclub Fire
Goa Dairy: गोवा डेअरीचे हायफॅट दूध महागले! नाताळ तोंडावर असताना दरवाढ; गोपनियतेमुळे उलटसुलट चर्चा

या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला जबाबदार धरले जात असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच निष्पाप लोकांचा बळी गेला, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

Goa Nightclub Fire
Goa nightclub fire: गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू, हडफडेच्या रोमिओ लेनमध्ये घडली घटना

या भीषण आगीत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. यामध्ये २३ जणांचा मृत्यू धुरामुळे गुदमरून झाला असून, दोन जणांचा मृत्यू आगीत भाजल्यामुळे झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून, मृतांपैकी काही पर्यटक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com