CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Birch Club Fire: 'बर्च अग्निकांडा'वर सरकारला काही लपवायचे आहे का? 2ऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक; मुख्‍यमंत्री करणार सविस्‍तर भाष्‍य

Goa Winter Assembly Session: हडफडेतील ‘बर्च बाय रोमियो लेन क्‍लब’ला आग लागून २५ जणांचा मृत्‍यू झाल्याच्‍या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्‍या दुसऱ्या दिवशीही (मंगळवारी) सभागृहात उमटले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडेतील ‘बर्च बाय रोमियो लेन क्‍लब’ला आग लागून २५ जणांचा मृत्‍यू झाल्याच्‍या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्‍या दुसऱ्या दिवशीही (मंगळवारी) सभागृहात उमटले. यावरून विरोधी आमदार अधिकच आक्रमक झाल्‍यानंतर शुक्रवारी त्‍यावर सविस्‍तर भाष्‍य करू, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

तरीही विरोधकांनी आपले म्‍हणणे रेटण्‍याचाच प्रयत्‍न केल्‍यानंतर सभापती गणेश गावकर यांनी त्‍यांना रोखत प्रश्‍‍नोत्तराचा तास सुरू केला. ‘बर्च बाय रोमियो लेन क्‍लब’मधील आगीवर भाष्‍य करण्‍याची मागणी करीत सोमवारी विरोधी आमदारांनी विधानसभा सभागृहात राज्‍यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्‍यासमोर घोषणाबाजी करीत गोंधळ घातला.

त्‍यामुळे मार्शल्‍समार्फत विरोधी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्‍यात आले. विरोधी आमदारांनी मंगळवारी यासंदर्भातील प्रश्‍‍न विचारला होता. परंतु, तो पुढे ढकलल्‍याने विरोधी पक्षनेते युरी आलेमाव प्रश्‍‍नोत्तराच्‍या तासाआधीच आक्रमक झाले.

राज्‍यातील महत्त्‍वाच्‍या प्रश्‍‍नांवर सरकारला उत्तरे द्यायची नाहीत. त्‍यामुळेच आमचे प्रश्‍‍न पुढे ढकलण्‍यात येतात तसेच मंत्रिमंडळ बैठकांची इतिवृत्तेही आम्‍हाला मिळत नाहीत, असा आरोप त्‍यांनी केला. ‘बर्च बाय रोमियो लेन क्‍लब’मधील आग दुर्घटनेवर भाष्‍य करण्‍यास सरकार का घाबरत आहे? यात सरकारला काही लपवायचे आहे का? असे प्रश्‍‍नही त्‍यांनी उपस्‍थित केले.

न्‍यायप्रविष्‍ट विषयांवर चर्चा नको : सभापती

राज्‍यातील जे विषय सध्‍या न्‍यायप्रविष्‍ट आहेत किंबहुना ज्‍या प्रश्‍‍नांवर न्‍यायालयात सुनावण्‍या सुरू आहेत, अशा प्रश्‍‍नांवर विधानसभा सभागृहात चर्चा करता येत नाही.

त्‍यामुळे सदस्‍यांनी कायदा आणि संविधानिक मूल्‍यांचा आदर ठेवूनच सभागृहाचे कामकाज पुढे नेण्‍याची गरज असल्‍याचे निवेदन सभापती गणेश गावकर यांनी केले. परंतु, त्‍यालाही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्‍टन डिकॉस्‍ता यांनी आक्षेप घेतला.

सरकारला काहीही लपवायचे नाही!

युरी आलेमाव यांच्‍या आरोपांवर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ‘रोमियो लेन क्‍लब’मधील अग्नितांडवाबाबत सरकारला काहीही लपवायचे नाही. यावर मी शुक्रवारी सविस्‍तर भाष्‍य करणार आहे. त्‍यामुळेच विरोधकांचा याविषयीचा प्रश्‍‍न पुढे ढकलला आहे. विरोधी आमदारांना सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नाही. त्‍यामुळेच त्‍यांनी सोमवारी राज्‍यपालांच्‍या अभिभाषणातही गोंधळ घातला, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferdino Rebello: ‘इनफ इज इनफ'! न्यायमूर्ती रिबेलोंमुळे सामान्य माणसातही ताकद तयार होत चालल्याचे प्रतीत व्हायला लागले आहे..

अग्रलेख: खोसला फरार, लुथरा बंधू - व्यवस्थापकांचे हात वर, सरपंचांचीही जबाबदारी नाही; गुन्हा घडला आहे पण गुन्हेगार कुणीच नाही

Valpoi Fire News: देऊळवाडा–हिवरे येथे बागायतीला आग, झोपडीही जळून खाक; Watch Video

Margao: सायकलवरून 'पाव' विकणाऱ्यांकडे मागितला 50 रुपये सोपो कर! तक्रार करण्‍याचे नगराध्यक्षांचे आवाहन

Goa Assembly Live: "टॅक्सी चालकांनो काळजी करू नका, लवकरच मिळेल 'गुड न्यूज'"

SCROLL FOR NEXT