Goa Nightclub Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Nightclub Fire: 'बर्च क्‍लब' आग प्रकरणाची धग वाढली! आणखी तिघे स्‍कॅनरखाली; अबकारी, अग्निशमनच्‍या अधिकाऱ्यांना नोटिसा

Arpora Nightclub Fire: : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्‍लबला लागलेल्या आग प्रकरणाची धग आणखी तीन अधिकाऱ्यांना लागण्‍याची शक्‍यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्‍लबला लागलेल्या आग प्रकरणाची धग आणखी तीन अधिकाऱ्यांना लागण्‍याची शक्‍यता आहे. याप्रकरणी अबकारी खात्‍याने एक तर अग्निशमन दलाने दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केल्‍याची माहिती सरकारी सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

बर्च बाय रोमियो लेन क्लबचा भाग सीआरझेडमध्ये येत असल्याचा आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केला होता. न्यायदंडाधिकारी चौकशीत हा भाग मिठागर व सीआरझेडमध्ये येत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांवर यासंदर्भात कारवाईची टांगती तलवार लटकू लागली आहे. याविषयी दक्षता खात्याकडून लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या आदेशानुसार प्रक्रिया

बर्च बाय रोमियो लेन क्‍लबला बेकायदा परवाने देण्‍यापासून ते जमीनदोस्‍त होण्‍यापासून रोखण्‍यापर्यंतच्‍या प्रक्रियेत विविध सरकारी खात्‍यांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करण्‍याचे स्‍पष्‍ट संकेत मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत. त्‍यानुसार त्‍यांनी कार्यवाही सुरू केल्‍याचेही सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

‘अन्न व औषध’कडूनही होणार कारवाई

अन्न व औषध प्रशासन खात्याकडूनही या क्लबच्या तपासणीशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या खात्याकडून कोणत्या त्रुटी ठेवल्या होत्या, यावर बोट ठेवण्यात आले आहे.

त्यानुसार आता कारवाई केली जाणार आहे. नगर व ग्राम नियोजन खात्याकडून कोणताही परवाना, दाखला नसताना त्या ठिकाणी बांधकाम कसे उभे राहिले, असा मुद्दाही चर्चेत आला आहे.

सरपंच व सचिव यांच्यावर कारवाई केल्यानंतर कोणते घटक याला जबाबदार आहेत, याची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

भविष्‍यकालीन खबरदारी

क्लबना परवानगी देण्यासाठी किंवा किनारी भागातील व्यावसायिक आस्थापनांना परवानगी कोणी व कशी द्यावी, याची प्रणाली ठरवण्यात येत आहे.

महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्याकडे सरकारने हे काम सोपवले आहे. त्यांच्या अहवालानंतर त्याचे पालन करण्याची सक्ती करणारा आदेश सरकारी पातळीवर जारी केला जाणार आहे.

पंचायतींकडून यापुढे ना हरकत दाखले दिले जाऊ नयेत, यासाठी गटविकास अधिकारी पातळीवर दक्षता घेण्यात येत आहे.

पंचायतींनी एक तर परवानगी द्यावी किंवा परवानगी नाकारावी, असा आदेश पंचायतींना देण्यात आला आहे. हडफडेच्या कारवाईनंतर किनारी भागातील सरपंच व पंचायत सचिव धास्तावले आहेत.

सरकार कारवाई करताना दया-माया दाखवणार नाही, असे स्पष्ट झाल्याने सध्या पंचायत पातळीवर ना हरकत दाखलेच देणे बंद झाल्याची माहिती मिळाली आहे.

संशयित मोडक याचा जामीन अर्ज

बर्च बाय रोमियो लेनचे मुख्य महाव्यवस्थापक (सीजीएम) राजीवकुमार मोडक, ज्याला २५ जणांचा बळी घेणाऱ्या आग दुर्घटना प्रकरणात हणजूण पोलिसांनी अटक केली होती, त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. आता या अर्जावर ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. हा जामीन अर्ज बीएनएनएस कायद्याच्या कलम ४८३ अंतर्गत दाखल केला आहे.

६ डिसेंबर रोजी हडफडे येथे घडलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी संशयित राजीवकुमार मोडक याला हणजूण पोलिसांनी इतर संशयित आरोपींसह अटक केली होती. मोडक सध्या कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. मोडकने आपल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, त्याची नियुक्ती इंदूर येथील रोमियो लेन फ्रँचायझीमध्ये झाली होती आणि गोव्यातील आस्थापनामध्ये त्याची कोणताही निर्णय घेण्याची भूमिका नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT