Arpora Nightclub Fire: नाईटक्लबवर मेहेरबानी भोवली; हडफडे पंचायत सचिव बडतर्फ तर सरपंच अपात्र! कारवाईचा बडगा कठोर; आता नंबर कोणाचा?

Arpora Nightclub Fire Update: नियमांचे उल्लंघन करून आस्थापनधारकांना संरक्षण दिल्याने पंचायत पदाधिकाऱ्यांचे संगनमत स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Arpora Nightclub Fire
Arpora Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाईट क्लबचा परवाना नूतनीकरण न झाल्याची माहिती असूनही आपण इतर खात्यांना कळविले नाही किंवा जागा सील केली नाही, अशी कबुली हडफडे पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर दिली आहे. तर, सरपंच रोशन रेडकर यांनीही आपण याबाबत इतर खात्यांना कळविले नसल्याची कबुली दिली आहे. दरम्‍यान, बागकर यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करणारा व सरपंच रेडकर याला अपात्र ठरवणारा आदेश पंचायत संचालक महादेव आरोंदेकर यांनी जारी केला आहे.

हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांचे पंचायत सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले असून त्यांना पुढील पाच वर्षात कोणत्याही पंचायतीची निवडणूक लढवण्यास बंदी घालणत आली आहे. या दोघांच्या भूमिकेमुळे नाईट क्‍लब बेकायदेशीर सुरू राहिला, असा ठपका न्यायदंडाधिकारी चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करून आस्थापनधारकांना संरक्षण दिल्याने पंचायत पदाधिकाऱ्यांचे संगनमत स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सुरुवातीपासून जवळपास सर्व ना-हरकत प्रमाणपत्रांवर हडफडे-नागोवा सरपंचांच्या स्वाक्षऱ्या असून अधिकारांचा गैरवापर झाला आहे. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार तातडीच्या तपासण्या, रात्रीची गस्त व अचानक तपासण्या न झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे.

नोंदी तपासल्या असता १९९८-९९ मध्ये सुनील दिवकर व प्रदीप घाडी आमोणकर यांनी ‘मैझॉन्‍स हॉटेल’च्या नावाने सुरुवातीची बेकायदेशीर बांधकामे केल्याचे आढळून आले असून तेच मुख्य दोषी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Arpora Nightclub Fire
Salman Khan Goa Property: सलमान खानच्या गोव्यातील मालमत्तेवर टांगती तलवार; CRZ नियमांच्या उल्लंघनावरुन हायकोर्टात याचिका दाखल!

हडफडे गावातील सर्वे क्रमांक १५८/० वरील ‘कोंडोनिचो/कॉर्डिनिचो आगोर’ या मालमत्तेशी संबंधित आहे, जी पूर्व व उत्तर बाजूस मिठागरांनी वेढलेली आहे. ही मालमत्ता मुळात सिल्‍वेरा कुटुंबाची होती. १९८६-८८ मध्ये ती अनिल व ख्रिस्तीन मडगावकर यांना विकली गेली.

त्यानंतर १९९५ मध्ये सुनील दिवकर व प्रदीप आमोणकर यांच्याकडे हस्तांतरित झाली आणि अखेरीस २००० साली ‘मैझॉन्स कोस्टलाईन डेव्हलपर्स प्रा. लि.’ या त्यांच्या कंपनीकडे देण्यात आली असे अहवालात म्हटले आहे. चौकशी अहवालातून अत्यंत गंभीर निष्कर्ष समोर आले असून ग्रामपंचायत, विविध सरकारी विभाग आणि संबंधित आस्थापनधारक यांची संगनमताने झालेली बेजबाबदार, बेकायदेशीर कृत्ये उघडकीस आली आहेत.

बेकायदा बांधकाम : प्रदीप घाडी आमोणकर, सुनील दिवकर मुख्‍य दोषी

बनावट कागदपत्रांचा वापर

व्‍यापार परवान्यासाठी सादर केलेल्या अर्जात गंभीर अनियमितता आढळून आली. अर्जावर वेगवेगळ्या शाईत नंतर शब्द घातले गेले होते. आवश्यक कागदपत्रे, आराखडे, छायाचित्रे आणि जमिनीचे उतारे जोडलेले नव्हते. घर क्रमांकाबाबतही गंभीर गोंधळ दिसून आलाय. अस्तित्वात नसलेला घर क्रमांक दाखवून परवाने मिळवण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पंचायत कार्यालयात अर्ज आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत कोणतीही तपासणी न करता परवाना देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Arpora Nightclub Fire
Goa New Year Celebration: नववर्षासाठी ‘तगडा’ बंदोबस्त; महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी Video

परवाना नसतानाही व्यवसाय सुरू

हडफडे-नागोवा ग्रामपंचायतीने १६ डिसेंबर २०२३ रोजी ‘बीईंग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा हडफडे एलएलपी’ या संस्थेला बार, रेस्टॉरंट तसेच नाईट क्लब व्यवसाय चालविण्यासाठी आस्थापना परवाना दिला होता. सदर परवाना ३१ मार्च २०२४ पर्यंतच वैध असल्याचे आढळून येते. त्यानंतर आजतागायत हा परवाना नूतनीकरण करण्यात आलेला नाही, असे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे.

अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे संचालक नितीन रायकर यांनी आज स्पष्ट केले की, यापूर्वी नियमभंगामुळे सील करण्यात आलेल्या क्लबांना विभागाकडून कोणतेही नवीन अग्निसुरक्षा प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नाही. अशा सर्व आस्थापनांचे सध्या सखोल लेखापरीक्षण सुरू आहे. नियमांचे पूर्ण पालन केले जात आहे की नाही, याची पडताळणी केली जात आहे.

आम्ही त्या ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केलेले नाही. सुरिंदर खोसला यांना आम्ही मालमत्ता दिली. जो काही बेकायदेशीरपणा उघड झाला आहे, तो त्यांनी केलाय. ‘गुगल मॅप’ तपासला तर आमच्‍या म्हणण्याची पुष्टी होईल. आम्‍हाला दोषी ठरवण्यामागे कोणाचा तरी कट आहे.

-प्रदीप घाडी आमोणकर (जागेचे मालक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com