water tab gomantak digital team
गोवा

Arambol News : हरमल ग्रामसभेत पाणी प्रश्‍नावरून वादंग

बेकायदा कुपनलिकांचा प्रश्न गाजला : रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला

गोमंतक ऑनलाईन टीम

हरमल : गावात पाणी टंचाईने कहर केला असून, कूपनलिकांची संख्या वाढल्याने विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जलस्त्रोत खात्याची परवानगी न घेता,मोठ्या प्रमाणात कूपनलिका झाल्याने, विहिरी ओस पडल्या आहेत. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण वाढवा, असा सल्ला काहींनी दिला. तसेच बेकायदेशीर व मोठ्या आकाराच्या कूपनलिका बंद करण्याचा ठराव हरमल ग्रामसभेत संमत केला.

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळवून गोव्यावर अन्याय केला असून त्यावर उपाय म्हणून म्हादई वन्यजीव भाग अभयारण्य आरक्षित करण्याचा ठराव महेश वायंगणकर यांनी मांडला आणि तो बहुमताने मंजूर करण्यात आला.गावातील पाणी टंचाईस बेकायदा कूपनलिका कारणीभूत असून त्यांना परवानगी कोणी दिली, असा सवाल संजय नाईक यांनी विचारला.

कुपनलिकेमुळे पाण्याची पातळी कमी झाली आणि विहिरी कोरड्या पडल्या. कूपनलिकांचे खोदकाम जलस्रोत खात्याच्या परवानगीने होत असल्यास त्यास पंचायत आडकाठी आणू शकत नाही, असे सरपंच बेर्नाड फर्नांडिस यांनी सांगितले. मात्र, बेकायदेशीर बोअरवेल थांबवाव्यात, असे संजय नाईक यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच इनासियो डिसोझा, मार्सेलिन फर्नांडिस, टोनी डिमेलो, एडविन डिसोझा, माजी सरपंच रामचंद्र केरकर, डॉम्निक फर्नांडिस, रामकृष्ण माज्जी आदींनी चर्चेत भाग घेतला. उपसरपंच दिव्या गडेकर, पंच अनुपमा मयेकर, सोनाली माज्जी, सांतान फर्नांडिस, गुणाजी ठाकूर, भिकाजी नाईक, रजनी इब्रामपूरकर तसेच गटविकास खात्याचे सुनील पालयेकर निरीक्षक म्हणून उपस्थित होते. पंच भिकाजी नाईक यांनी आभार मानले.

कचरा कंत्राटाची चौकशी करा!

सुका कचरा गोळा करण्याचे कंत्राट अवैधपणे सुरू असून त्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. कंत्राटदाराच्या कामावर लक्ष द्यावे, त्यासाठी कामगारांची नेमणूक करावी तसेच रस्त्यालगतचा कचरा गोळा करण्याचे आदेश द्यावेत, असे वायंगणकर, नाईक यांनी सुचवले. या कंत्राटदाराची थकबाकी देताना नियमांचे उल्लंघन केले असून, जनतेच्या पैशांचा गैरवापर केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच व ग्रामस्थांत तू- तू- मै- मै झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्याची स्थिती उदभवली. मात्र, सरपंच फर्नांडिस यांनी चर्चेवर पडदा टाकला.

पंचायत फंड वाढवा

पंचायत क्षेत्रातील कित्येक हॉटेल्स, रेस्टॉरंटस व अन्य आस्थापनांकडून फी वसुली न केल्याने पंचायतीचे नुकसान होत असल्याचे महेश वायंगणकर यांनी सांगितले. त्यासाठी पंचायतीने दोन कर्मचाऱ्यांकरवी वसुली करावी व महसूल वाढवावा. होर्डिंग्ज, साईन बोर्ड, आस्थापनांची फी यातून महसूलप्राप्ती होऊ शकते, असे ग्रामस्थांनी सुचवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT