Mayem News Dainik Gomantak
गोवा

Mayem News: मयेत कळसोत्सवाला तणावाचे गालबोट; उत्सव अर्ध्यावर केला रद्द

अधिकाराच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये संघर्ष

गोमंतक ऑनलाईन टीम

Mayem News: सुरवातीचा गोंधळ आणि किरकोळ तणावानंतर सुरळीतपणे साजरा होत असतानाच, मयेतील कळस उत्सवाला मंगळवारी मध्यरात्री तणावाचे गालबोट लागले. परिणामी कळसोत्सव अर्ध्यावरच रद्द करण्यात आला.

देवीचा कळस घरोघरी फिरत असतानाच, काल मध्यरात्री कळसोत्सवावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. अधिकाराच्या मुद्यावरून एका (नाईक आणि अन्य समाज) गटाने कळस गावात फिरवण्यास तीव्र आक्षेप घेतल्यानंतर तणाव निर्माण झाला.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच, पोलिस बंदोबस्तात देवीचा कळस अखेर श्री महामाया मंदिरात नेण्यात आला. देवीचा कळस सध्या मंदिरातील गर्भकुडीत ठेवण्यात आला आहे. घरोघरी भेट दिल्यानंतर येत्या शनिवारी (ता. 4) रोजी श्री महामाया मंदिरात कौलोत्सव साजरा होऊन या उत्सवाची सांगता होणार होती.

पण त्याआधीच हा उत्सव रद्द करण्याची वेळ आल्याने, देवीचा कळस आमच्या घरी कधी येणार, त्याची उत्सुकता लागून राहिलेल्या आणि देवीच्या कळसाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या भाविकांची मात्र घोर निराशा झाली आहे.

वादानंतर उत्सवाला सुरवात

समस्त भाविकांना उत्कंठा लागून राहिलेल्या मये येथील श्री माया केळबाय देवस्थानच्या कळसोत्सवाला शुक्रवारपासून ( ता. 24) प्रारंभ झाला होता. मान आणि अधिकाराच्या मुद्द्यावरुन उत्सवाच्या सुरवातीलाच कळस मंदिराबाहेर काढताना श्री महामाया मंदिरात आणि नंतर श्री केळबाय या दोन्ही देवस्थानाच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.

तरीही न्यायालयाच्या निवाड्यानुसार डिचोलीचे मामलेदार राजाराम परब यांच्या सूचनेनुसार पोलिस बंदोबस्तात कळसोत्सवाला सुरवात झाली होती. मंगळवारी जांभूळभाट-मये कळस घरोघरी फिरत असताना, रात्री उशिरा तिथे तणाव निर्माण झाला.

मान आणि अधिकाराच्या मुद्यावरुन गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेल्या नाईक गावकर आणि अन्य समाजातील बायका मुले मिळून शेकडो लोक तिथे जमा झाले. त्यांनी देवस्थान समितीला अर्थातच परब समाजाला कळसोत्सवात भाग घेण्यास विरोध केला. यावरून वाद उद्‍भवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT