ferry boat Dainik Gomantak
गोवा

चोडण धक्क्यावर फेरी बोट कप्तानाची मनमानी

व्हीडिओ व्हायरल: प्रवाशांतून संताप; संबंधितांवर कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक

तिसवाडी: चोडण धक्क्यावरून आज पहाटे फेरीबोट सोडण्यास डिझेल भरण्याची सबब देऊन रायबंदरकडे सोडण्यास फेरीबोट कप्तानाने नकार दिल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमात आज दिवसभर व्हायरल झाला आहे. प्रवाशांना त्रास देण्याच्या प्रकाराचा हा व्हीडिओ पाहून कर्मचाऱ्यांच्या मनमानीबद्दल सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अशा या बेजबादार फेरीबोट कप्तानावर व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व चोडण बेटावरील लोकांकडून होत आहे

या संदर्भात या मार्गावर देखरेख करणारे नदी परिवहन खात्याचे ज्येष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले यांना विचारले असता त्यानांही ही माहिती चोडणच्या एका व्हॉटस्‌ अप समुहावरच मिळाली असल्याचे सांगितले. यांची गंभीर दखल खात्याने घेतली असून उद्या सकाळी त्या फेरीबोट कप्तान व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या संदर्भात ते दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. खात्यात बेशिस्त चालू देणार नसल्याचे अधिकारी भोसले यांनी यांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार आज पहाटे ५ वाजता एक प्रवासी पियेदाद नामक फेरीबोटीत आला व फेरीबोट रायबंदर वाटेवर स्पेशल फेरीबोट सोडण्याची मागणी केली. फेरीबोटीत डिझेल भरत असून विलंब लागेल, असे त्याला सांगत त्यांनी २० मिनिटे वेळ घालविल्याने व डिझेल भरण्याची कोणीही हालचाल करत नसल्याने शेवटी प्रवाशाने व्हीडिओ घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्वरित फेरीबोट सोडण्यात आली. याचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने लोकांत या कप्तानाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT