बागवाडात पायवाट अडवल्याने तणाव

बाऊन्सरकडून मारहाण: दिल्लीस्थित हॉटेल कंपनीविरोधात पेडणे पोलिसांत तक्रार
Tension due to Footpath obstruction in Morjim
Tension due to Footpath obstruction in MorjimDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: दिल्लीस्थित एका उद्योजकाकडून गेली 19 वर्षे बागवाडा मोरजी येथील शापोरा नदी किनारी भागात हॉटेल उभारणी सुरू आहे.आज शुक्रवार दि.22 रोजी या जागेतील स्थानिकांच्या पारंपरिक पायवाटा अडवण्याचा प्रकार घडल्यामुळे संतप्त स्थानिकांनी एकत्र जमून वाट मोकळी होत नाही, तोपर्यंत जागेवरून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. तत्पूर्वी काही कंपनीच्या महिला बाउन्सरनी स्थानिकांना मारहाण केल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पेडणे पोलिसांत नोंदवली आहे.

Tension due to Footpath obstruction in Morjim
‘मांडवी’ हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

तक्रारीस अनुसरून पेडणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शिवाय सरपंच वैशाली शेटगावकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पंचायत मंडळ घटनास्थळी येऊन यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु जोपर्यंत आमच्या पारंपरिक पायवाटेवर टाकलेले दगड आणि पत्र्यांचे कुंपण हटवले जात नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही, अशी भूमिका घेतली.

सविस्तर माहितीनुसार बागवाडा मोरजी शापोरा नदी किनारी स्थानिकांच्या जमिनी दिल्लीतील व्यावसायिक आणि मागच्या एकोणीस वर्षापूर्वी विकत घेतलेल्या आहेत. या जमिनीत बागवाडा मोरजी येथील स्थानिक रहिवाशी मागच्या कित्येक वर्षापासून याच जागेचा स्मशानभूमी म्हणून वापर करत. स्था

निकांना विश्वासात न घेता स्थानिक जमीनदाराने परस्पर दिल्लीवाल्यांना जमिनी विकलेल्या आहेत. त्यामुळे दिल्लीस्थित कंपनीने या जागेत दगडी आणि तारेचे कुंपण घालण्याचा प्रयत्न केला होता. दहा वर्षांपूर्वी बागवाडा येथील श्रीमती बागकर यांच्या मृतदेहावर या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यविधीस हरकत घेतली होती. आजपर्यंत बागवासीयांच्या ताब्यात स्मशानभूमी देण्याची प्रक्रिया झालेली नाही. संबंधित हॉटेल कंपनीने हे प्रकरण न्यायप्रविष्ट करून अंत्यविधीस हरकत घेतली आहे. अधूनमधून काही नागरिक त्या ठिकाणी अंत्यविधी करतात, परंतु त्यांच्या विरोधात कंपनीने गुन्हे दाखल केले असून त्यांना न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

Tension due to Footpath obstruction in Morjim
आश्वासने पाच वर्षांत पूर्ण करणार: दिव्या राणे

बागवाडा या भागात पंधरा घरे आहेत. 22 एप्रिल रोजी सकाळी कंपनीने पारंपरिक वाट अडवून वाट मोकळी ठेवण्याचे आश्वासन पाळले नाही. कंपनीने पत्र्यांचे कुंपण उभारून व ट्रक दगड टाकून पूर्ण पायवाट बंद केली. त्यामुळे जाब विचारण्यास गेलेल्या महिलांना बाऊन्सरकडून महिलांना मारहाण झाली. त्यानंतर संतपलेले स्थानिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. तोपर्यंत महिला बाउन्सर आणि कंपनीचे संबंधित घटनास्थळापासून पळून गेले. त्यानंतर पेडणे पोलिस उपनिरीक्षक फौजफाट्यासह तिथे आले. शिवाय मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर उपसरपंच अमित शेटगावकर ,पंच सदस्य संपदा शेटगावकर, पंचक पवन मोरजे, पंच प्रकाश शिरोडकर,पंचक उमेश गडेकर , पंच विलास मोरजे, शिवाय नागरीक त्याच प्रमाणे गोवा प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाबी बागकर,सुधीर कांनायीक, स्थानिक दिलीप बागकर, भक्त दास बागकर, सुधीर कानाईक अमित मोरजे, मच्छिंद्रनाथ शेटगावकर आदी मंडळी उपस्थित झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com