Devotees left for Pandharpur from  File Photo
गोवा

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीनिमित्त हरमलवासीयांच्या पायी पंढरपूर यात्रेला सुरुवात...

34 वर्षांपासून अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार

Kavya Powar

Kartiki Ekadashi Pandharpur Wari: कार्तिकी शुद्ध एकादशी जी प्रबोधिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जाते. यादिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार सांभाळतात, असे मानले जाते.

आषाढी एकादशीप्रमाणेच या एकादशीला सुद्धा गोव्यातून पायी वारी करत वारकरी विठ्ठलाच्या भक्तीपोटी पंढरपुरात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणे हरमल गावातील वारकरी यंदाही पायी वारी करत पंढरपुरसाठी रवाना झाले आहेत.

मागील 34 वर्षांपासून अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे वारकरी न चुकता वारी करत आहेत. आमदार जीत आरोलकर, सरपंच आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वारीचा आरंभ करण्यात आला.

अतिशय भक्तीभावाने, विठ्ठलाच्या अभंग-गजरात दंग होत सर्व वयोगटातील वारकरी यामध्ये सहभागी होतात आणि पायी चालत हा टप्पा गाठतात.

पंढरपूरला पायी जाण्याची प्रथा इथे पूर्वापार चालत आली आहे. हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो. त्याप्रमाणे यंदाही आम्ही पंढरपूरसाठी निघालो आहोत. विठ्ठल आमची ही यात्रा सफल करो, असे मत एका वारकऱ्याने व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT