Black Panther: धारबांदोड्यात पुन्हा ब्लॅक पँथरचे दर्शन! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पॅंथर दिसल्यामुळे परिसरात दहशत
Black Panther in Dharbandora
Black Panther in DharbandoraDainik Gomantak

Black Panther in Dharbandora

धारबांदोडा वंडाळा येथे काही दिवसांपूर्वी अतुल नाईक यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात ब्लॅक पॅंथर दिसला होता. तोंडात मांजर पकडलेला पॅंथर दिसल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. काल पुन्हा पॅंथर दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Black Panther in Dharbandora
Loutolim Villagers: लोटलीतील शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; बोरीतील नवीन पुलाला विरोध

इथे पहा CCTV फुटेज

मोकाट फिरत असलेल्या ब्लॅक पॅंथरने गावातील अनेक पाळीव प्राण्यांना आपले शिकार केले असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी पाहिल्यांना जेव्हा पॅंथर दिसला तेव्हा त्याची माहिती कोळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. वनविभागाच्या पथकाने परिसराला भेट दिली असता या ब्लॅक पँथरने गावातील 15 हून अधिक पाळीव कुत्र्यांना ठार मारल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

तत्पूर्वी 1 एप्रिल रोजी बाळी केपे येथे एका ब्लॅक पँथरला वनविभागाने सापळा रचत पकडल्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीनंतर ब्लॅक पँथरला वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com