Water shortage Gomantak Digital Team
गोवा

Arambol Water Shortage : नागरिकांचा संताप! हरमल पंचायत क्षेत्रात पाणी टंचाईचा कहर

नागरिकांत संताप : चार दिवसांनी होतो पुरवठा

गोमन्तक डिजिटल टीम

Arambol Water Shortage : येथील पंचायत क्षेत्रात पाणी टंचाईने कहर केला आहे. अलीकडे टॅंकरचे पाणी चार-पाच दिवसांत येत असल्याने नागरिक व गृहिणीत संताप व्यक्त होत आहे. खालचावाडा भाग पर्यटनदृष्ट्या गजबजलेला असल्याने पाण्याची टंचाई नित्य जाणवत असते. लोकवस्तीशिवाय गेस्ट हाऊस, हॉटेल्स, रेस्टॉरंट व अन्य लहान-मोठे उद्योग असल्याने पाण्याची बारमाही गरज असते.

मात्र, उंचावरील वायंगणकर व फामापा पॉइंटनजीक पाणी चढत नसल्याने माज्जी यांच्या निवासस्थानाकडून फामापा पॉइंट लोकवस्तीत पाईपलाईन नेल्याने मधलावाडा भागात तसेच वायंगणकर यांच्या निवासस्थान परिसरात तसेच जुज्या पोलिस स्थानक भागात पाण्याचा तुटवडा नेहमीच असतो.

याचा परिणाम अनपेक्षित वेळेत पुरवठा होत असल्याने लोकांना रात्रीच्या वेळेत झोपमोड करून पाण्यासाठी तिष्ठत राहावे लागते. मात्र, एक-दोन घागर इतके पाणीसुद्धा मिळत नसल्याने देविदास नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

जलवाहिनीचे काम विचाराधीन

या भागांत नवीन जलवाहिनी घालण्याचे काम पूर्णपणे विचाराधीन आहे. कित्येक ठिकाणी फुटपाथ, घरे, कुंपणे तसेच आस्थापने आदी उभी राहिली असल्याने समस्या बिकट आहे. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी या समस्येच्या निवारणासाठी खास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

खाते निष्क्रिय

या भागातील नागरिकांनी पेडणे कार्यालयावर मोर्चा, घागर मोर्चा व हरमल बंद केल्यावर त्या दोन दिवसांत पाणीपुरवठा वेळेत केला जातो. मात्र, पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती पाहता पुन्हा हरमल बंद करण्याचा प्रयत्न का करू नये, असे मत डिमेलो यांनी व्यक्त केले. खालचावाडा भागांत काही जणांकडून बुस्टर पपंच्या साहाय्याने पाणी चोरी होत असल्याचे उघड झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT