Arambol foreign tourists bhajan Dainik Gomantak
गोवा

Arambol Beach Bhajan: हरमल किनाऱ्यावर 'हरे रामा, हरे कृष्णा’चा गजर! विदेशी पर्यटक भजनात दंग; भाविकांचा वाढतोय सहभाग

Arambol foreign tourists bhajan: हरमल किनाऱ्यावर रोज चालत असलेल्या विदेशी पर्यटकांच्या 'हरे रामा, हरे कृष्णा’ गजरामुळे देशी पर्यटकांमध्ये त्यांच्याविषयी वेगळी प्रतिमा तयार होताना दिसते.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल किनाऱ्यावर रोज चालत असलेल्या विदेशी पर्यटकांच्या 'हरे रामा, हरे कृष्णा’ गजरामुळे देशी पर्यटकांमध्ये त्यांच्याविषयी वेगळी प्रतिमा तयार होताना दिसते. संध्याकाळच्या वेळेत ही विदेशी भक्त मंडळी भगवे वा सफेदसर रंगाचे कपडे घालून भजनात दंग झालेली दिसतात.

प्रथम साधारण चार-पाचशे मीटर अंतराची फेरी गजर करत पूर्ण केल्यानंतर एका ठिकाणी ते ठाण मांडले जाते व नंतर भजनाला सुरुवात होते. टाळ, मृदंग, डफ, हार्मोनियम,पखवाज आदी वाद्ये साथीला असतात. स्पीकर, माईक आदी साधनांचा वापर करून होणार्‍या या भजनात गायनाबरोबर नाचही सामील असतो. नाचताना त्यात उत्स्फूर्तपणे इतरांनाही सामील करू घेतले जाते.

हे भजन अंधार पडेपर्यंत नित्यपणे होते. त्यात रविवार व गुरुवार या दोन दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतात. या भजनात भाग घेणारे अधिकतर पर्यटक ओशो (रजनिश) अनुयायी असून त्यांचा आहारसुद्धा शुद्ध शाकाहारी असतो.

नशापान करणाऱ्या लोकांना त्यात भाग घेण्यास सक्त प्रतिबंध केला जातो. पाश्चात संगीताऐवजी भारतीय भजन संस्कृतीत रमणार्‍या या मंडळीमुळे हरमल किनार्‍यावरील संध्याकाळ निश्चितच रम्य होते असे अनेकजण म्हणतात. ‘ह्या 'हरे रामा, हरे कृष्णा गजरात तल्लीन होणारे अनेक विदेशी पर्यटक, हंगामाच्या उत्तरार्ध पुणे तसेच मनाली भागात मनशांतीसाठी स्थलांतर करतात’ असे जर्मन पर्यटक ओल्गा सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol: 'मसाज पार्लर, स्पाचे परवाने रद्द करा'! हरमलवासीयांची पंचायतीवर धडक; पर्यटनस्थळ बदनाम होत असल्याचा दावा

पैसे घेऊन सरकारी नोकऱ्या 'विकल्या' तर नोकरशाही जनतेची सेवा करणार की भ्रष्टाचार? पोसलेले अराजक नष्ट करण्यासाठी सुसंस्कार हवेत..

Bangladesh Violence: बांगलादेशात 'हिंदू' निशाण्यावर! डिसेंबर महिन्यात 12 जणांचा बळी; हत्यांमागे नियोजित कट?

अग्रलेख: 25 बळी गेल्यानंतर पंचायत बरोबर होती, असा निवाडा काय कामाचा? पंचायती पारदर्शकता बाळगतील का?

Holi Special Train: होळीच्या पार्श्वभूमीवर खुशखबर! 34 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT