Goa Bhajan Culture: सत्तरीत जपली जाते पारंपरिक भजन कला! प्रथा जपणुकीत युवकांनी रस घेण्याची गरज

कालौघात हवी नवसंजीवनी; ज्येष्ठ कलाकारांचे मत
Goa Bhajan Culture
Goa Bhajan CultureDainik Gomantak
Published on
Updated on

पद्माकर केळकर

सत्तरी तालुक्यातील विविध मंदिरांत भजन सादर करण्याची परंपरा आजही कायम आहे. तिचे प्रमाण कमी झाले असले तरीही ज्येष्ठ मंडळी व काही कलाकारांनी ही कला जोपासली आहे. ही भजन कला अशीच सुरू राहण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. तरच या कलेला नवसंजीवनी प्राप्त होईल.

सत्तरी तालुक्यातील गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस रात्री आठ वाजता लोक टाळ, तबला, हार्मोनियम, पेटी, मृदुंग अशा वाद्यांच्या गजरात भजन कला सादर करतात.

काही ठिकाणी घुमट आरतीही म्हटली जाते. धावे, आंबेडे, नगरगाव, ब्रह्मकरमळी, पणशे, शिंगणे, शेळप, बांबर, नानोडा आदी गावांत सुरस भजने सादर केली जातात. वेळगे गावात सोमवारी, शुक्रवारी महिला, पुरुष वर्ग भजन करतात.

Goa Bhajan Culture
FC Goa: एफसी गोवाचे आक्रमण आणखी धारदार; उदांता सिंगसोबत दीर्घकालीन करार

टाळ-वाद्यांचा निनाद

पणशे येथील रामनाथ पणशीकर म्हणाले की, आमच्या गावातील मंदिरांत भजने सादर केली जातात. ती कला-परंपरा जपली आहे. आता तरुणांनी त्यात योगदान दिले पाहिजे. पणशेतील शांतादुर्गा मंदिरात श्रावण महिन्यात, तसेच दर शुक्रवार आणि अन्य दिवशी भजनांचा निनाद सुरू असतो.

महिलांचाही पुढाकार

दृकश्राव्य माध्यमे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन ही संकल्पना हळूहळू लोप पावत आहे. मात्र, अजूनही सत्तरीत ही परंपरा अनेक ठिकाणी सुरू आहे. भक्तियोगाची साधना म्हणून त्याला चांगला प्रतिसाद लाभलेला दिसतो. सत्तरीतील महिला वर्गानेही यासाठी पुढाकार घेतला आहे. चरावणे गावातील विघ्नहर्ता केळबाय भजनी मंडळातील महिला भजने सादर करतात. त्यांनी अनेक कार्यक्रम, तसेच स्पर्धांत भाग घेतला आहे. गेली दोन वर्षे चरावणेच्या महिला ही कला अवगत करत आहेत.

नवे कलाकार घडावेत!

सत्तरीत विशेष करून श्रावण महिन्यात भजने केली जातात. पण तिथे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात. काही ज्येष्ठ मंडळींनी ही कला जोपासलीय. ती धुरा आता नव्या पिढीने स्वीकारली पाहिजे. केवळ गायक, वादक, साथी त्यापलीकडे लोकांची गर्दी गरजेची आहे. काही गावात महिलांचा प्रतिसाद दिसतो. एरव्ही ऑर्केस्ट्रा असेल तर शिट्या, टाळ्यांनी प्रोत्साहन दिले जाते. पण भजनांसाठी गावकरी मंडळींनी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे. नवीन कलाकार घडले पाहिजेत, असे खडकी येथील वंदना जोशी म्हणाल्या.

भजन हे देवाची स्तुती करण्यासाठी गायले जाणारे गाणे आहे. हा योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. ही महाराष्ट्र, गोवा राज्यातील एक लोककलाही आहे. स्थानिक स्तरावर संवादिनी, मृदुंग, तबला, ढोलकी, टाळ, टाळ्या यांचा वापर करून देवळात देवासमोर बसून वा घरीच भजन गायले जाते.

- रोहिदास गावकर, कलाकार.

आम्ही लहानपणापासून भजन ऐकण्यासाठी मंदिरात जात होतो. त्यामुळे भजनांची आवड निर्माण झाली. आता आम्ही भजन करण्यासाठी विविध ठिकाणी जातो. त्यातून भक्तिमार्ग साध्य होतो. आजच्या घडीला चरावणेसह अन्य काही गावांतील महिलाही पुढे येत असून भजन परंपरा जतनासाठी हातभार लावत आहेत.

- चंद्रु सावंत, कोपार्डे-सत्तरी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com