arambol Road Dainik Gomantak
गोवा

Arambol News : हरमल भागातील मासळी मार्केटनजीकच्या रस्त्याची विदारक स्थिती; रस्त्यांवरील खड्ड्यांत फुलझाडांचे रोपण

‘पीडब्ल्यूडी’चा ठेंगा : खड्ड्यांत फुलझाडांचे रोपण करू; युवकांकडून संताप

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची अक्षरशा दुर्दशा झाली आहे. ही दुर्दशा रोखण्यासाठी युवकांची फौज दरवर्षी काम करते. मात्र, सार्वजनिक बांधकाम खाते युवकांच्या संयमाला सुरुंग लावण्याचे काम करते. त्यामुळे युवकांचा संयम सुटत चालला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांवरील खड्ड्यांत फुलझाडांचे रोपण करण्याची तयारी चालवली असल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रणव परब यांनी सांगितले.

हरमल पंचायत क्षेत्रातील मासळी मार्केटनजीकच्या रस्त्याची विदारक स्थिती सार्वजनिक बांधकाम खात्याची अगतिकता दाखवते. या रस्त्यावर दरवर्षी खड्डे पडण्याची कारणे शोधून काढण्याची तसदी साबांखा घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खात्याच्या अभियंत्यांना पावसाळ्यापूर्वी या भागातील रस्त्यांची स्थिती व दर्जा दाखवून दिला. मात्र परिस्थितीत कसलीही सुधारणा झाली नसल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते परब यांनी सांगितले.

सार्वजनिक सभागृहानजीकच्या गतिरोधकासमोर दरवर्षी त्याच प्रकारचे खड्डे पडलेले असतात. गेल्यावर्षी माजी पंचसदस्य प्रवीण वायंगणकर यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले होते. यंदा तेच खड्डे पुन्हा निर्माण झाल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. वाहन खरेदीवेळी रस्ता शुल्क (रोड टॅक्स) वेळीच भरतात,

त्या वाहनचालकांना किमान रस्ता सुरक्षा मिळाली पाहिजे व त्यांचा तो अधिकार असतो. मात्र, भ्रष्ट सरकार रस्ते उत्कृष्ट दर्जाचे देऊ शकत नसल्यास सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावून बसते. साबांखाचे मंत्री नीलेश काब्राल अर्थहीन विधाने करीत असल्याने त्यांना पदच्युत करण्याची मागणीही परब यांनी केली आहे.

अपघात कमी होतील

पावसाचे पाणी रस्त्यातील खड्ड्यांत असल्याने वाहनचालक पाण्यातून जाण्याऐवजी खड्ड्यांतून जातो. परिणामी वाहनावरील ताबा सुटून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी वृक्षारोपण करून वाहनचालकांची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अपघातही कमी होतील, असे परब यांनी सांगितले.

भूमिगत केबल्सचे निमित्त

यंदा साबांखाकडे भूमिगत केबल्सचा प्रभावी मुद्दा असल्याने प्रत्येकवेळी चार दिवसांत स्थिती ठीक होईल, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात जनतेच्या पैशांची लूट होत असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम खात्याने लवकरात लवकर समस्या न सोडवल्यास रस्त्यावर उतरून खात्याच्या निषेधार्थ वृक्षारोपण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT