Arambol Road Issue Dainik Gomantak
गोवा

Arambol: हरमलमध्ये रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत, प्रशासनाचे दुर्लक्ष

Arambol Road Issue: हरमल पंचायत क्षेत्रातील भटवाडी येथील मुख्य रस्ता हा खड्ड्यात हरवला आहे. रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत असल्यानं नागरिक हैराण झाले आहेत.

Sameer Amunekar

मोरजी: हरमल पंचायत क्षेत्रातील भटवाडी येथील मुख्य रस्ता हा खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार व्यवस्थाही कोलमडून पडल्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत.

या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाने या रस्त्याकडे अजूनपर्यंत लक्ष का दिले नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पावसाचे पाणी या रस्त्यावर भरून राहिल्यानंतर कुठे खड्डा आहे हे दुचाकी वाहनचालकांना कळत नाही. वा कधी-कधी अपघातही घडत असतात.

दरम्यान, काँग्रेसचे नेते देवेंद्र प्रभुदेसाई आणि त्यांच्या समर्थकांनी मांद्रे मतदारसंघातील जे रस्ते धोकादायय बनलेले आहेत, त्यांची जर १५ जुलैपूर्वी दुरुस्ती केली नाही, तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर पार्से येथील रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे.

रस्ते खचले!

कोरगाव-भटवाडी याही ठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. भूमिगत वीज केबल आणि जलवाहिनी घातल्या गेल्या, त्यावेळी व्यवस्थित दुरुस्ती न केल्यामुळे या रस्त्यांना खड्डे पडले आणि रस्ते खचत गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT