Arambol Beach Dainik Gomantak
गोवा

Arambol: 'मसाज पार्लर, स्पाचे परवाने रद्द करा'! हरमलवासीयांची पंचायतीवर धडक; पर्यटनस्थळ बदनाम होत असल्याचा दावा

Arambol Illegal Activities: नागरिकांनी माजी सरपंच इनसियो डिसोझा यांच्या समवेत पंचायतीवर धडक देत यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल: येथील समुद्रकिनारी भागात वेश्याव्यवसाय वाढीस पूर्णतः मसाज पार्लर, स्पा आदी कारणीभूत असून या आस्थापनांना दिलेले परवाने त्वरित रद्द करण्यात यावेत, अशी मागणी खालचावाडा भागातील नागरिक व व्यावसायिकांनी केली आहे. नागरिकांनी माजी सरपंच इनसियो डिसोझा यांच्या समवेत पंचायतीवर धडक देत यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

रही प्रभागांतील स्पा, मसाज पार्लरांना दिलेले ना-हरकत दाखले त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय होत असून रात्रीवेळी या भागात दलाल व त्यांच्या माणसांचा वावर वाढला आहे. त्यामुळे त्यांना जारी केलेले दाखले रद्द करावेत, अशी मागणी माजी सरपंच इनसियो डिसोझा यांनी यावेळी केली.

स्पा, मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे. अनेकजण मसाजाचा कसलाच अनुभव व प्रमाणपत्र नसताना बेकायदा व्यवसाय करतात, असे जॉकी रॉड्रिग्ज यांनी सांगितले. पंचायत स्थानिक व्यावसायिकांकडे अनेक दाखल्यांची मागणी करते, परंतु परप्रांतीय व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करते. अनेकजण बेकायदा व्यवसाय करतात, असे क्लाउड रॉड्रिग्ज यांनी सांगितले.

पंचायत क्षेत्रात आदरातिथ्य करणारे पर्यटन हवे. वेश्याव्यवसायामुळे हे पर्यटनस्थळ बदनाम होऊ नये. त्यासाठी पंचायतीने ग्रामस्थांच्या मदतीने पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. येथे स्पा, मसाज पार्लरांना थारा देऊ नये, असे पीटर कार्दोज यांनी सांगितले.

योग्य निर्णय घेणार ; सरपंच

नागरिकांनी निवेदन देऊन येथील वेश्याव्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे. ही मागणी रास्त असून ग्रामस्थांना आपला पूर्ण पाठिंबा आहे. तसेच पोलिस कारवाईस संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन पंच प्रजॉय फर्नांडिस यांनी यावेळी दिले.

येत्या मासिक बैठकीत या निवेदनावर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सरपंच सुशांत गावडे यांनी सांगितले. दरम्यान, पंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास २२ फेब्रुवारीला होणारी ग्रामसभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT