A.R Rehman at IFFI 2024 Goa Dainik Gomantak
गोवा

A.R Rehman at IFFI 2024 : "आपली संस्कृती म्हणजे रोमियो आणि ज्युलिएट नाही"; चित्रपट महोत्सवात ए. आर. रहमान यांचा सुरेल मास्टर क्लास

A.R Rahman Discusses Indian Culture at Film Festival: मास्टर क्लासमध्ये ‘संगीत क्षेत्रातील आव्हाने आणि त्यांच्या सर्जनशील प्रक्रिया’ याविषयी त्यांनी जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला

Akshata Chhatre

A.R Rehman Master Class at IFFI Goa 2024

पणजी, ता. २७ (प्रतिनिधी): जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन तिच्यासारखे व्हावे असे मनात ठरवितो, तेव्हा ती व्यक्ती आपल्यासाठी उत्कृष्टच असते. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी स्थापित केलेल्या उच्च प्रमाणांवर प्रकाश टाकला तर आपण त्यांची नक्कल निश्‍चितच करू शकत नाही; पण त्यांच्या उतुंग व्यक्तिमत्वाकडून प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो असे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए. आर. रहमान यांनी सांगितले.

ए. आर. रहमान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) रोजी हजेरी लावली होती. मास्टर क्लासमध्ये ‘संगीत क्षेत्रातील आव्हाने आणि त्यांच्या सर्जनशील प्रक्रिया’ याविषयी त्यांनी जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला.

रहमान म्हणाले की जेव्हा मी चांगल्या मनःस्थितीत नसतो, तेव्हा मी फोटो काढणे किंवा चाहत्यांशी संवाद साधणे टाळतो. लोकं माझ्यासोबत फोटो काढायला समोर येतात तेव्हा तो माझ्यासाठी एक आशीर्वादच असतो. पण, जर का मन:स्थिती चांगली नसेल, तर अशावेळी फोटो काढणं मी टाळतो.

जेव्हा ‘गुरू’ चित्रपटातील ‘जागे’ हे गाणं लोकप्रिय झालं, तेव्हा ‘मैदान’सारख्या पुढील चित्रपटामध्ये अशाच गाण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती. एकंदरित या गाण्याची पुनरावृत्ती मी करावी, अशी चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा होती. अशावेळी चित्रपटाच्या कथानकाशी जोडून सतत नवीन काहीतरी करणं, हे आव्हानात्मक काम संगीतकार म्हणून असतंच असंही रहमान म्हणाले होते.

पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण नकोच

रहमान यांनी देशातल्या संगीतातील सांस्कृतिक ओळख आणि स्थानिक रसिकांच्या आवडीचे महत्त्व अधोरेखित केलं. ते म्हणाले की, प्रत्येक देशाला त्याची अद्वितीय संस्कृती आणि पाककृती लाभलेली असते. आपण आंधळेपणाने पाश्चात्य गोष्टींचे अनुकरण करू शकत नाही. आपली संस्कृती ‘रोमियो आणि ज्युलिएट’ नाही, हे प्रत्येकवेळी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे.

मी समाजाचे काहीतरी देणे लागतो!

चेन्नईमधील दिव्यांग व्यक्तींना मदत करण्याच्या आपल्या परोपकारी कार्यावर रहमान यांनी प्रकाश टाकला. रहमान म्हणाले की, मी समाजाला काहीतरी देण्यात विश्वास ठेवतो. माझ्या ‘९९ सॉन्ग्स’ या चित्रपटात, मी दिव्यांगांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी दिव्यांग व्यक्तिरेखांचा समावेश केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT