
पणजी: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोप सोहळ्याला २८ नोव्हेंबर रोजी बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील अनेक दिग्गज सिने कलाकार उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची जोडीही उपस्थित राहणार आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकलेल्या या जोडीला आता ‘पुष्पा-२’च्या प्रमोशनच्या निमित्ताने इफ्फीच्या समारोप सोहळ्यात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये गुरुवारी संध्याकाळी ४.३० वाजता होणाऱ्या या समारोप समारोहात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) उपस्थित राहणार आहेत. शिवाय गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष दिलायला लोबो तसेच मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे.
प्रतिभाशाली अभिनेते प्रतीक गांधी आणि विक्रांत मेस्सी हेही समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. लोकप्रिय वेब सीरिज ‘बंदीश बँडिट्स’च्या टीममधील रित्विक भौमिक, श्रेया चौधरी, मॅम खान, निकिता गांधी आणि दिग्विजयसिंह राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्सदेखील या सोहळ्यात होणार आहे. यंदाच्या इफ्फीचा समारोप सोहळा म्हणजे, सिनेमातील उत्कृष्ट संगीताची जादू आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीचे एक अदभुत मिश्रण असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.