Aqua Goa Mega Fish Festival 2024 Dainik Gomantak
गोवा

Aqua Goa Mega Fish Festival: फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पणजीत फिश फेस्टिव्हल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रचार गाड्यांना हिरवा झेंडा

यंदाचे हे सातवे मेगा फिश फेस्टिव्हल 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत असणार आहे.

Kavya Powar

Aqua Goa Mega Fish Festival 2024: यंदाच्या वर्षातील अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे. याबाबत आज (23 जानेवारी) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये फेस्टिव्हलच्या जनजागृती प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.

यंदाचे हे सातवे मेगा फिश फेस्टिव्हल 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी पर्वरी सचिवालय, पर्वरी येथे अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2023-24 च्या 7 व्या आवृत्तीचा प्रचार करण्यासाठी असलेल्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पणजीतील साग (SAG) कांपाल मैदानावर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे

पारंपरिक मत्स्य व्यवसायाला चालना

राज्यातील पारंपरिक मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या या व्यवसायाशी निगडीत योजनांची माहिती महोत्सवामार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्यासोबत सी फूड संदर्भात जनजागृती व्हावी, हा या महोत्सवामागील उद्देश आहे.

पर्यटक आणि खवय्यांसाठी पर्वणी!

या महोत्सवात गोव्याबरोबरच शेजारील राज्यातूनही अनेक सी फूड स्टॉल्ससोबत विविध प्रकारचे स्टॉल्स असतात. शिवाय इथे माशांच्या विविध जाती-प्रजाती, मत्स्यपालनासाठी लागणारे सर्व साहित्य विक्रीला असते. त्यामुळे ज्यांना अक्वेरीयम मत्स्यपालनाची आवड आहे, त्यांची इथे विशेष गर्दी असते.

सोबतच फेब्रुवारी महिन्यात गोव्यात फिरायला आलेले पर्यटक महोत्सवाला आवर्जून भेट देतात. पर्यटकांसोबत स्थानिकांचीही या उपक्रमाला पसंती असल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

Viral Video: रिल्ससाठी कायपण! साडी नेसून पठ्ठ्याने लावले ठुमके, मेट्रोमधील भन्नाट डान्स व्हायरल; नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत घेतली शाळा

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

SCROLL FOR NEXT