Goa News Updates 23 January 2024: दिवसभरातील ठळक घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Goa Breaking News 23 January 2024: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 23 January 2024
Goa Live Updates 23 January 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

धक्कादायक ! महिला ट्रायल कैदीला पुरुष तुरुंग कर्मचाऱ्यांची मारहाण?

कोलवाळ तुरुंगात एका नायजेरियन महिला ट्रायल कैदीला पुरुष तुरुंग कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचे वृत्त हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेच्या अंगावर बऱ्याच जखमा आढळल्या असून सविस्तर घटनाक्रम अद्याप समजू शकला नाही.

कोकणी संगीतकार रामानंद रायकर यांना विमला व्ही. पै विश्व कोकणी जीवन सिद्धी सन्मान पुरस्कार जाहीर

गोव्यातील प्रख्यात कोकणी संगीतकार रामानंद रायकर "विमला व्ही. पै विश्व कोकणी जीवन सिद्धी सन्मान पुरस्कार" जाहीर. आंतरराष्ट्रीय संस्था विश्व कोकणी केंद्र मंगलोर तर्फे कोकणी कला, संस्कृती आणि साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रभू श्री रामाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, संबधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी

प्रभू श्री रामाविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी संबधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करुन अटक करण्याची मागणी गोमंतक स्वराज्य संस्था आणि म्हापसा येथील युवकांनी केली आहे.

PM नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात

बेतुल येथे एनर्जी वीकचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी 6 फेब्रुवारी रोजी गोव्यात येणार असून त्यानंतर त्यांची मडगाव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलीय. या दौऱ्याबाबत आढावा घेण्यासाठी भाजप कोअर कमिटीची बैठक झाल्याची माहिती मिळली आहे.

रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधात वेळसाववासीयांची निदर्शने

रेल्वे दुपदरीकरणाच्या विरोधात वेळसाववासीयांची निदर्शने केली. दुपदरीकरणाचे पर्यावरण परिणाम मूल्यांकन न केल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.

गोवा लोकसभेच्या दोन्ही जागेवर काँग्रेसचाच दावा

गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसनेच मागितल्या असल्याची प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती. 'आप'ला उत्तर गोव्याची जागा दिल्याचा दावा खोटा. जागा वाटपाबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरु, दोन्ही जागा काँग्रेसलाच हव्या असल्याचे वरिष्ठाने कळवल्याचे पाटकरांचे स्पष्टीकरण.

सातवे मेगा फिश फेस्टिव्हल 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत असणार

यंदाचे हे सातवे मेगा फिश फेस्टिव्हल 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर यांनी पर्वरी सचिवालय, पर्वरी येथे अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2023-24 च्या 7 व्या आवृत्तीचा प्रचार करण्यासाठी असलेल्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.

पणजीतील साग (SAG) कांपाल मैदानावर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे

खासगी क्षेत्रात गोमन्तकीयांना 80 टक्के नोकऱ्यांची मागणी, विजय सरदेसाई दुसऱ्यांदा मांडणार विधेयक

गोव्यात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधीबाबत प्रथम गोमन्तकीयांचा विचार केला जावा, खासगी क्षेत्रात गोमन्तकीयांना 80 टक्के नोकऱ्यांची मागणी करणारे खासगी विधेयक गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई दुसऱ्यांदा मांडणार आहेत.

गोवा स्टेट एम्पलॉयमेन्ट ऑफ लोकल कॅन्डिडेट बिल, 2024 येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

बनावट कागदपत्रांच्या आधारे गोव्यातून मिळवला पासपोर्ट; पुण्यात 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी विभागाने निगडी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

अटकेतील पाच जणांपैकी तिघांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने गोव्यातून पासपोर्ट मिळवल्याचे तपासातून उघड झाले आहे.

न्यायालयाने निर्देश देऊनही राज्यातील भटक्या गुरांची समस्या जैसे थे! वाहचालक त्रस्त

राज्यातील भटक्या जनावरांचा मुद्दा नव्या वर्षातही जैसे थे आहे. भटकी गुरे रस्त्याच्या मध्ये ठाण मांडून बसतात. रस्त्यावर इतरत्र फिरत असतात यामुळे पादचाऱ्यांना आणि विशेषत: वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र यामध्ये कोणताच बदल न झाल्याचे दिसून येते.

गोव्यात स्टार्टअप्सला मिळणार बूस्टर; HDFC देणार 99 लाखांची आर्थिक मदत

गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स विभागाने HDFC बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे. स्टार्टअपसाठी प्रोत्साहन आणि जागरुकता हे या कराराचे उद्दिष्ट असून, एचडीएफसी या उपक्रमासाठी 99 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर केले आहे.

किर्लपाल दाभाळ पंचायतीत नेमकं चाललंय कांय?

पंचायतीतला घरपट्टी घोटाळा उघड करुन राजीनामा दिलेल्या दामोदर बांदेकरांची पुन्हा किर्लपाल दाभाळ पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड. घोटाळा उघड करण्यासाठी सरंपच झालो असल्याचा बांदेकरांनी केला होता दावा.

'मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन...' 5 मार्चला विधानभवनावर मोर्चा

'मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर एसटी'चा, 5 मार्च रोजी गोवा विधानसभेवर एसटी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोर्चा. या काळात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

...म्हणून मी इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी नकार दिला!

उत्तर गोव्यातील जागा देण्याच्या आश्वासनावर इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधण्यात आला. पण स्थानिक नेत्यांऐवजी आघाडीच्या 15 सदस्यांच्या टीमने माझ्याशी संपर्क साधणे गरजेचे होते; ते न झाल्याने मी नकार दिला. इंडिया आघाडीची आणि आरजीची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे उभे राहू. आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांची माहिती

फोंडा पोलीस स्थानकाला शववाहिकाच नाही! पोलिसांच्या तपासकामात अडथळा

फोंडा, म्हार्दोळ आणि कुळे पोलीस स्थानकांमध्ये सध्या एकही शववाहिका कार्यरत नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. फोंडा पोलीस स्थानकात असलेली शववाहिका कुळे आणि म्हार्दोळ स्थानकांसाठीही वापरण्यात येते. मात्र सध्या ती उपलब्ध नसल्याने तपासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे पोलीस सांगत आहेत.

डोकं पाण्यात बुडवून दीक्षा गंगवार हिची हत्या

तीन दिवसांपूर्वी काब - द - राम समुद्र किनाऱ्यावर खून करण्‍यात आलेल्‍या दीक्षा गंगवार हिचा मृत्‍यू नाक व तोंड जबरदस्‍तीने पाण्‍यात बुडवून केल्‍याचे वैद्यकीय तपासात उघड झाले आहे. तिचं डोकं पाण्‍यात बुडवून ठेवून श्वासोच्छ्वास बंद केल्‍याने तिचा गुदमरून मृत्‍यू झाल्याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

जाणून घ्या गोव्यातील आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.41

Panjim ₹ 97.41

South Goa ₹ 97.75

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 89.97

Panjim ₹ 89.97

South Goa ₹ 90.29

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com