Apply for mundkar lawsuits, 10 thousand claims will be settled; Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

मुंडकार खटल्यांसाठी अर्ज करा, 10 हजार दावे निकाली काढणार; प्रमोद सावंत

कोणी अर्ज केला नसल्यास अजूनही मुंडकार प्रकरणाबाबत अर्ज करा; प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

कोणी अर्ज केला नसल्यास अजूनही मुंडकार प्रकरणाबाबत अर्ज करा. सरकारच्या या कार्यकाळात सर्व मुंडकार प्रकरणे, वन हक्क कायद्याखालील 10 हजार दावे निकाली काढून लोकांना त्यांचे अधिकार देऊ तसेच पुढील दीड वर्षांत 5 हजार वन हक्क दावे निकालात काढले जातील अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी दिली.

दरम्यान, माझ्याकडे असलेली तिन्ही खाती लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तिन्ही खात्यांना योग्य न्याय देणार असल्याचं बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केलं होते. मुंडकार खटल्यांसाठी यापुढे 'तारीख पे तारीख' नाही, तर 6 महिन्यांत प्रलंबित खटले सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही गोव्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी म्हटलं होत. यानंतर आता प्रमोद सावंत यांनी सरकारच्या (Government) या कार्यकाळात सर्व मुंडकार प्रकरणे, वन हक्क कायद्याखालील 10 हजार दावे निकाली काढून लोकांना त्यांचे अधिकार देऊ तसेच पुढील दीड वर्षांत 5 हजार वन हक्क दावे निकालात काढले जातील अशी माहिती दिली.

तब्बल एक आठवड्यानंतर महसूल, कामगार आणि कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या पदाचा ताबा घेऊन कार्यालयात हजेरी लावली. ते महसूल विभागातील वरिष्ठांशी चर्चा करणार असून कामाचा आढावा आणि पुढील कामकाजाची आखणी करणार आहेत. मनासारखी खाती न मिळाल्यामुळेच बाबूश मोन्सेरात (Babush Monserratte) यांनी आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा ताबा घेतला नसल्याची चर्चा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT