booster doses
booster doses Dainik Gomantak
गोवा

बुस्टरबाबत राज्यात अनास्था; खासगी इस्पितळेही बेफिकीर

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यात कोविडच्या चौथ्या लाटेचा तडाखा बसण्याची शक्यता असतानाही ‘बुस्टर डोस’ला गोव्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. सरकारी पातळीवर होणाऱ्या मोहिमेकडे लोकांनी पाठ फिरवली असतानाच खासगी पातळीवरील खूप कमी इस्पितळांनी बुस्टर देण्यास पुढाकार घेतला आहे. भाजपाने मात्र आपल्या ‘टिका उत्सवा’द्वारे अकरा तालुक्यांमध्ये 60वर्षांहून कमी असलेल्यांनाही सरकारी खर्चाने बुस्टर देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.

(Apathy in Goa about booster Dose Private hospitals also have no worries)

खासगी इस्पितळांपेक्षा सरकारच्याच वैद्यकीय सेवेवर लोकांचा अधिक विश्वास असल्याने सरकारच्या टिका उत्सवांमध्ये आता कमी वयोगटातीलही लोकांना बुस्टर डोस देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कोविडविषयक तज्ज्ञ समितीचे एक सदस्य डॉ. धनेश वळवईकर म्हणाले, ‘‘गोव्यात बुस्टर डोसचे प्रमाण वाढवायचे असेल तर सरकारने आता सर्वांनाच बुस्टर देणे सुरू करायला हवे. सर्वच खासगी इस्पितळांमध्ये ही सेवा उपलब्ध नाही व हे बुस्टर डोस अधिक प्रमाणात खरेदी करावे लागत असल्याने इस्पितळे फारसा उत्साह दाखवत नाहीत.’’

गोवा सरकारच्या आरोग्य खात्याच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी बुस्टर डोस घेण्यासाठी अजूनपर्यंत खूपच कमी प्रतिसाद मिळाल्याचे मान्य केले.

मडगावमध्ये तीन, वास्कोत एक व पणजीत तीन खासगी इस्पितळांमध्ये ही सोय उपलब्ध आहे. ‘‘खासगी इस्पितळांच्या मते त्यांना जादा प्रमाणात ग्राहक हवे असतात. बुस्टरच्या एका कुपीमध्ये दहा मात्रा असतात व त्या दहाही द्याव्या लागतात. ज्याअर्थी लोकांचा कमी प्रतिसाद आहे, त्याअर्थी नवीन इस्पितळे बुस्टर सेवा देण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, हे स्वाभाविक आहे.

सर्वसामान्यांना त्रास; मंत्र्यांनाही अनुभव

सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधला असता, ज्यांना खरोखरच बुस्टर घ्यायचा आहे, त्यांना सरकारी पातळीवर फारशी मदत लाभत नसल्याच्या तक्रारी ऐकू आल्या. म्हापशाच्या आझिलो इस्पितळात एक कुटुंब लस घेण्यासाठी गेले असता केवळ ६० वर्षांवरील व्यक्तीलाच तेथे बुस्टर देण्यात आला. 59 वयोगटातील एका महिलेला नकार देण्यात आल्याने तिला आपल्या मुलांसह मडगाव गाठावे लागले.

भाजपच्या बार्देशमधील एका माजी मंत्र्यालाही एक अनुभव आला. खासगी इस्पितळामध्ये लोक जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. मडगावच्या एका इस्पितळातील प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, बुस्टरमध्ये फारसा नफा नसल्याने खासगी पातळीवर हे लसीकरण हाती घेतले जात नाही. ते म्हणाले, ‘‘खासगी इस्पितळांनाही दहा डोसेस असलेल्या कुप्या दिल्या जातात. त्यातील तीन जरी बाकी राहिले तर नुकसान सहन करावे लागते. सरकारने जरी या कालबाह्य डोसेस मागे घेऊन नवीन देण्याची योजना आखली असली तरी लोकांमध्येच अनास्था असल्याने लसीकरणासाठी लोक पुढे येत नाहीत.

ज्या इस्पितळांमध्ये बालकांवर उपचार केले जातात तेथे मात्र काही प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ‘‘बुस्टर डोस मिळविण्यासाठी आम्हाला एकदमच सहा लाख रुपये गुंतवणूक करावी लागते हासुद्धा खासगी इस्पितळे या व्यवसायात न पडण्याचे प्रमुख कारण आहे’’, अशी माहिती एका खासगी इस्पितळाच्या प्रमुखाने दै. ‘गोमन्तक’ला दिली.

सरकारने खासगी इस्पितळांना बुस्टर देण्यासाठी आता राजी करणे आवश्यक आहे. त्यासाठी खास सवलती त्यांना दिल्या जाव्यात, असे फोंडा शहरातील एका प्रमुख इस्पितळाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

Cashew Fest Goa 2024: ध्वनी भानुशालीचे सादरीकरण, डिजे हर्षा; काजू महोत्सवाच्या पहिल्या दिवासाची झलक Video

Panaji News : वितरणातील त्रुटींमुळेच पाणीटंचाईचे संकट; मुख्य अभियंता प्रमोद बदामी

Congo Violence: काँगोमध्ये हिंसाचार सुरुच! विस्थापितांच्या छावणीवर बॉम्ब हल्ला; 35 जणांचा मृत्यू

Margao News : उल्‍हास वेर्लेकर कुटुंबीयांकडून विविध संस्‍थांना १० लाखांची देणगी; लग्नाच्या वाढदिनी भेट

SCROLL FOR NEXT