Israeli Drug Dealer Arrest Dainik Gomantak
गोवा

Israeli Drug Dealer Arrest: इस्रायली 'अटाला'ला 5 दिवसांची पोलिस कोठडी! चरस, कोकेनसह इतर मुद्देमाल जप्त

Israeli Atala arrested in Siolim: देशभर चर्चेचा विषय ठरलेला इस्रायली नागरिक अटाला उर्फ यानिव्ह बेनाहीमला गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शिवोलीत ताब्यात घेतले.

Sameer Panditrao

पणजी: २०१० मध्ये अमली पदार्थ व्यवहारावरून राज्यभर नव्हे, तर देशभर चर्चेचा विषय ठरलेला इस्रायली नागरिक अटाला उर्फ यानिव्ह बेनाहीमला गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शिवोलीत ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, प्रथमच अटालाकडून पोलिसांनी सुमारे ८.७० लाखांचे अमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

ड्रग्स व्यवहारातील अटाला हा प्रमुख ड्रग पॅडलर म्हणून ओळखला जात होता. आता पुन्हा तो गोवा पोलिसांच्या हाती लागल्याने अमली पदार्थ विक्री व्यवहाराची पाळेमुळे किती घट्ट रोवली गेली आहेत, हे दिसून येते. पोलिस अधीक्षक टिकम सिंग आणि उपअधीक्षक नेर्लन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सजिथ पिल्लई, उपनिरीक्षक दीनदयाळ रेडकर, हवालदार उमेश देसाई, फर्नांडिस, शिपाई गोदीश गोलतेकर, सुमित मुटकेकर, साईराज नाईक, राहुल गावस, विशाल शितोळे, कुंदन पटेकर, स्नेहा साळवी, सीमा हडपडकर यांनी ही कामगिरी केली.

आठ लाख ७० हजारांचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थविरोधी पथकाने शुक्रवार, ४ रोजी मध्यरात्री ते शनिवार, ५ रोजी पहाटे यादरम्यान ही कारवाई केली. तपासणीवेळी अटालाकडे ७.५० लाखांचा ५० ग्रॅम कोकेन व १.२० लाखांचा १२० ग्रॅम चरस असा एकूण ८ लाख ७० हजारांचा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी बजावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT