पोलिस बंदोबस्त  Dainik Gomantak
गोवा

मडगावात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी मोहीम

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगाव शेजारच्या रुमडामळ पंचायतीने आज पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली व रस्त्यावरील असंख्य अतिक्रमणे हटविली. यावेळी स्थानिक रहिवाशी आणि पंचायत सदस्य यांच्यात वादही झाला. या अतिक्रमणाविरोधात या पूर्वी नोटीस बजावूनही त्यांनी ती न हटविल्यामुळे शेवटी ही कारवाई करावी लागली, अशी माहिती स्थानिक सरपंच विनायक वळवईकर यांनी दिली.

सरपंच विनायक वळवईकर यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात आली. या वेळी मामलेदार कार्यालयाचे अधिकारी तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

सरपंच वळवईकर यांनी सांगितले की या अतिक्रमणांबाबत लोकांच्या असंख्य तक्रारी होत्या व त्यानंतर सर्वेक्षण करून संबंधितांना नोटिसाही बजावल्या होत्या. प्रत्यक्षात ही कारवाई गेल्या ८ मार्च रोजी होणार होती पण मतमोजणीमुळे पोलिस कुमक मिळेना व म्हणून ती आज करण्याचे ठरले.

आज सकाळी ती सुरू करून रस्त्यावरील काही विक्रेत्यांना हटविले, तेव्हा काहीनी अडथळा आणल्यावर सायंकाळी अधिक पोलिस कुमक मागवून मारूती मंदिर ते गौरी रेडिओ जंक्शनपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून सुमारे दोन ट्रक माल जप्त केला. ही मोहीम अधून मधून राबविली जाईल, असेही सरपंचांनी सांगितले. सायंकाळच्या कारवाईवेळी साधारण अडिचशे पोलिस रुमडामळमध्ये दाखल झाल्याने त्या भागाला पोलिस छावणीचे रुप आले होते.

धमक्या देणाऱ्यांविरोधात तक्रार: वळवईकर

अतिक्रमण विरोधी कारवाई करणे गरजेचे होते. यापूर्वीच ही कारवाई होणार होती. आज या मोहिमेनंतर आपणाला धमक्याही मिळाल्या व त्या संदर्भात आपण उद्या पोलिस तक्रार गुदरणार असल्याची माहिती सरपंच विनायक वळवईकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

SCROLL FOR NEXT