पणजी-बेती फेरीसेवा विस्कळीत

बेतीवासीयांचा बंदर कप्तान खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांना घेराव
Panaji-Bhati ferry service disrupted
Panaji-Bhati ferry service disruptedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजी फेरीधक्क्याजवळ गेल्या कित्येक महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे. या संथगतीने चाललेल्‍या कामामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा तर फेरीबोट चुकते. त्यामुळे संतप्त झालेले प्रवासी व बेतीच्या ग्रामस्थांनी साळगाव मतदारसंघाचे नवनिर्विचित आमदार केदार नाईक यांच्या उपस्थितीत आज बंदर कप्तान खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांना घेराव घातला व या फेरीसेवेत कोणताही हलगर्जीपणा होणार नसल्याची ग्वाही घेतली.

Panaji-Bhati ferry service disrupted
Goa Shigmotsav: गोमंतकीयांना उत्‍सुकता शिगमोत्सवाची

पणजी-बेती या फेरीसेवेचा वापर बेती व परिसरातील ग्रामस्थ पणजीत येण्या-जाण्यासाठी करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पणजी जेटीजवळ कॅसिनोंसाठी धक्का बांधण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे अधूनमधून ही फेरीसेवा बंद ठेवली जाते. परिणामी लोकांना तासन्‌तास तिष्ठत उभे राहावे लागते. त्‍यात वेळ वाया जातो व लोकांना वेळेवर कार्यालयात किंवा घरी पोचता येत नाही.

साळगावचे आमदार केदार नाईक यांच्याकडे यासंदर्भातची तक्रार बेती ग्रामस्थांनी केल्यानंतर आज ते प्रत्यक्ष ग्रामस्थांना घेऊन बंदर कप्तानच्या कार्यालयात मोर्चा घेऊन गेले. यावेळी बेतीतील ग्रामस्थ तसेच पंचसदस्यांनी ही फेरीसेवा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यानुसार नाईक यांनी अधिकाऱ्यांकडून

Panaji-Bhati ferry service disrupted
गोव्यात निवडणुकीची उत्‍सुकता शिगेला; उमेदवारांत धाकधूक

परिस्थिती समजून घेतल्यावर कॅसिनोच्या कामासाठी लोकांना वेठीस न धरण्याची सूचना केली. त्‍यानुसार बंदर कप्तान अधिकाऱ्यांनी बेती-पणजी फेरीसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी तांत्रिक पथकाला सूचना केल्या असल्याचे सांगितले. यापुढे प्रवाशांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दखल घेतली जाईल. सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेवेळी कोणत्याही अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागणार नाही व त्यासाठी सुरू असलेले काम बंद ठेवण्याच्या सूचनाही केल्या जातील असे आश्‍वासन या अधिकाऱ्यांनी मोर्चेकरांना व आमदारांना दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com