dead-body 
गोवा

कोरोनाचा आणखी एक बळी

Vilas Ohal

विलास ओहाळ

पणजी :

मडगावात शुक्रवारी एका भिकाऱ्याचा कोरोनामुळे बळी गेला. त्‍यामुळे कोरोनाबाधित मृतांची एकूण संख्‍या २१ वर पोहोचली आहे. गेल्‍या २४ तासांत १९६ कोरोनाबाधित रुग्‍ण आढळल्याचा अहवाल आरोग्य खात्याने जाहीर केला आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडे पॉझिटिव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार ३३७ झाली आहे. तसेच आज १२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

या आठवड्यात राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण शतकपार राहिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आजपासून तीन दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. आज दिवसभरात १९६ रुग्ण संक्रमित आढळले असल्याने एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १ हजार ३३७ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात ५ हजार ६२७ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील २१४६ जणांचे तपासणी अहवाल नकारार्थी आले आहेत. तर १९६ जणांचे अहवाल सकारात्मक आले असून, ३ हजार २८५ जणांचा अहवाल येणे प्रतीक्षेत आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये २६ जणांना ठेवण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.

कोरोना संसर्गस्‍थळे

सडा १००

बायणा १३८

कुडतरी ३९,

नवेवाडे ११२

चिंबल १२४

झुआरीनगर १९२

खारेवाडा १०४

बाळ्ळी ४२

वेर्णा येथील एका कंपनीतील १३९

पणजी शहरात दोन रुग्ण आढळले

पणजी शहरातील सांतिनेज बांध आणि मार्केटमधील एका इमारतीत कोरोनाचा संक्रमित रुग्ण आढळला आहे. सांतिनेज बांध येथे आढळलेली महिला ही महापालिकेतील कर्मचारी असून, ती मार्केटमध्ये काम करते. सध्या पोलिसांना सांतिनेज बांध हा परिसर सील केला आहे. तर मासळी मार्केटशेजारील इमारतीत भाड्याने राहणाऱ्या भाडेकरू कोरोना संक्रमित आढळल्याने पोलिसांनी ती इमारत सील केली आहे.

मार्केटमध्ये ज्या खोलीत संक्रमित सापडलेला कर्मचारी राहत होता, त्याच्याबरोबर राहणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी सांतिनेज बांध येथे जाऊन परिसराची पाहणी केली. याठिकाणी ५० घरे असून, उद्या त्यांना दूध पुरवठा केला जाणार आहे, त्याचबरोबर ३०० जणांची स्वॅब चाचणीही घेतली जाणार असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT